सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिर येथे सायबर सुरक्षा या विषयावर कुमारी ज्योती इंगोले यांचे व्याख्यान संपन्न

सांगोला विद्यामंदिर येथे गांधी प्रार्थनेच्या निमित्ताने औचित्य साधून सकाळ सत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा या विषयावर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची माजी विद्यार्थीनीं ज्योती इंगोले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यामध्ये त्यांनी आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल उदाहरणाद्वारे माहिती दिली. ओटीपी कोणास सांगू नये.अनोळखी नंबर वरून आलेले कॉल्स पडताळणी करून घेणे. व्हाट्सअप व इतर सोशल मीडियावर असलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी. त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉंग वापरून आपली माहिती सुरक्षित करावी.तसेच आपली माहिती ही आपली जबाबदारी आहे.असे त्यांनी सांगितले. मोबाईल,कम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी साधनावर अधिकृत अँटिव्हायरसचा वापर कसा करावा.इत्यादी संदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य श्री.गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य सौ.शहिदा सय्यद, पर्यवेक्षक बिभिषण माने,प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन प्रा.राजेंद्र कुंभार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!