सांगोला महाविद्यालयाचे नॅक मार्फत मूल्यांकन संपन्न

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे, सांगोला महाविद्यालय सांगोला या
महाविद्यालयाचे “राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद” अर्थात नॅक मार्फत दिनांक 12 व 13 ऑक्टोबर
2023 या दिवशी मूल्यांकन पार पडले. सदर मूल्यांकनासाठी राष्ट्रीय पातळीवरील त्रीसदस्यीय समिती
उपस्थित होती. सदर समितीमध्ये अनुक्रमे सुस्मीता प्रसाद पानी, एक्झीक्युटीव्ह मेंबर, राज्य उच्च
शिक्षण परिषद, ओरिसा, डॉ. रंगास्वामी एन. माजी कुलगुरू, बेंगलोर व डॉ मुत्याला सत्यनारायणा,
अधिष्ठाता, आंध्र प्रदेश हे उपस्थित होते.
सदर मूल्यांकनामध्ये समितीने महाविद्यालयातील विविध विभागाची पाहणी केली. तसेच त्यांनी
कार्यालयीन कामकाजाचाही आढावा घेतला. महाविद्यालय परिसरातील वेगवेगळ्या भौतिक सोयी-
सुविधांची त्यांनी पाहणी केली. महाविद्यालयातील मुलांचे व मुलींचे वसतिगृह, वसतिगृह कॅन्टीन, पाणी
सुविधा, पाणी संवर्धन, वृक्षारोपण, गांडूळ खत प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प अशा प्रकारच्या अनेक साधन-
सुविधांची त्यांनी पाहणी केली. तसेच महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक विभाग,
प्लेसमेंट सेल, अंतर्गत तक्रार निवारण समिती इत्यादी विभागाची त्यांनी तपासणी व पाहणी केली.
दुपारच्या जेवणा दरम्यान त्यांनी संस्था पदाधिकारी व माजी प्राचार्य यांचेशी संवाद साधला.
तसेच भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद
साधला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुरेश भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्व्यक डॉ.
तानाजी माने, कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचारी यांनी अथक प्रयत्न् करून भेटीची तयारी पूर्ण केली होती.
तसेच या तयारीसाठी संस्था पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मूल्यांकन व मानांकन परिषदेतील पाठविलेल्या
सदस्यांनी पाहणी व तपासणीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी नॅक कार्यालयाकडे पाठविला आहे.
एकंदरीत संपूर्ण पाहणी व तपासणी नंतर त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजा विषयी समाधान व्यक्त
केले आहे.