उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २२/१२/२०२३ रोजी संपन्न झाला. या पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्तात्रय तरळगट्टी सर, पीएसआय अनंत कुलकर्णी सर ,पोलीस कॉन्स्टेबल बोधगीरे साहेब, विद्यालयातील क्रीयांश कैवल्य व चैत्राली यांचे आजी आजोबा श्री दीपक चोथे व अलका चोथे संस्थेच्या अध्यक्षा संजीवनी ताई केळकर कोषाध्यक्ष शालिनीताई कुलकर्णी, श्रीकांत बिडकर सर माजी शिक्षिका धनश्री देशपांडे व विजया खडतरे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मागाडे बाई, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनीताताई कुलकर्णी उपमुख्याध्यापिका स्वरालीताई कुलकर्णी भोसले सर, मिसाळ सर व विद्यार्थी प्रतिनिधी स्वरदा वांगीकर ,दीबा मणेरी, वेदांत गडदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक कवी तरळगट्टीकर सर यांनी राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती , राष्ट्रनिष्ठा दिलेले स्वातंत्र्य टिकवून ठेवा जे जे आपण निर्माण केले ते जतन करण्याची जबाबदारी तुमची आहे यासाठी व्यवहारामध्ये आदर्श व्यक्तींचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून तुम्ही वागले पाहिजे वाचन लेखन व श्रवण त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे असे विद्यार्थ्यांना आव्हान केले. त्यांच्या स्वलिखीत काव्य वाचनाने कार्यक्रमाला एक वेगळी गोडी निर्माण झाली. त्याचप्रमाणे अनंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये खिलाडू वृत्तीचा अवलंब केला पाहिजे. संकटाशी झगडून पुन्हा उभे राहिले पाहिजे. स्पर्धा ही आपल्यावरच असते स्पर्धेमुळे दुर्गुणांवर मात करता येतो आत्मपरीक्षण करता येते असे विद्यार्थ्यांना सांगितले.आवडत्या क्षेत्रात नावलौकिक मिळवा प्रेरणा घ्या सतत प्रयत्न करा हा मोलाचा संदेश आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उत्कर्ष वाद्य वृंदाने स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मागाडे बाई यांनी विद्यालयाच्या वार्षिक उपक्रमांचा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.अनुराधा लिंगे बाई यांनी करून दिला. वर्षभरातील स्पर्धा क्रीडा स्पर्धा यांचे बक्षीस वाचन नकाते बाई शेळके सर , भाकरे बाई,चौरे सर व माध्यमिक विभागाचे बक्षीस वाचन प्रशांत भोसले सर, गौरी मिसाळ मॅडम व संचित राऊत सर यांनी केले. वर्षभरातील विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून या कार्यक्रमांमध्ये काही विशेष बक्षीस देण्यात आली त्यामध्ये समर्थ शिंदे गुणवंत विद्यार्थी म्हणून निवडण्यात आले तर पैलूदार विद्यार्थिनी म्हणून स्वरश्री देशपांडे हीची निवड करण्यात आली. तर आदर्श वर्ग म्हणून इयत्ता सहावी गुलमोहर वर्गाची निवड करण्यात आली.
स्नेहसंमेलनातील सादर केलेल्या नृत्य पैकी नववी कावेरी वर्गाच्या नृत्याला उत्कृष्ट नृत्य म्हणून विशेष बक्षीस देण्यात आले. याच कार्यक्रमात सोलापूर भारत स्काऊट आणि गाईड यांच्यातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट गायडर पुरस्कार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विश्रांतीताई मागाडे यांना मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दिपाली माळी व नवनाथ शेळेके सर यांनी केले . तर आभार रेश्मा सर्वगोड यांनी मानले. दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्नेहल रसाळ व प्रशांत भोसले सर , शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या कार्यक्रम पार पडला.