महाराष्ट्र

सांगोला येथील कचरा डेपोतील कचऱ्यावर नियमित प्रक्रिया करा व कचरा डेपो शहरातून बाहेर शिफ्ट करा.

.

सांगोला शहरात सांगोला कडलास रोडवर सांगोला शहरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर गेल्या अनेक वर्षापासून कचरा डेपो आहे. या कचरा डेपोतील कचऱ्यावर नियमित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियमित प्रक्रिया करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. सुधीर गवळी यांना शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी तसेच प्रतिष्ठित नागरीक यांनी  दिले आहे.

सांगोला शहर झपाट्याने वाढते आहे पूर्वी शहराबाहेर वाटणारी कचरा कुंडी वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात,वर्दळीच्या व लोकवस्तीच्या ठिकाणी आली आहे. कचरा डेपोच्या शेजारी लागूनच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,शहरातील सर्वाधिक विदयार्थी संख्येचे सांगोला महाविद्यालय, मुलींचे वसतिगृह तसेच लोकवस्ती आहे. कचरा डेपोतील काचरा सातत्याने पेटवल्यामुळे तेथे प्रचंड धूर होतो. सदरचा धूर हा कचरा डेपोपासून जवळ जवळ दीड-दोन किलोमीटर अंतरावर पसरतो . शेजारील जत सांगोला महामार्गावरील वाहतुकीस या धुरामुळे अडथळा निर्माण होतो. नागरिकांना या धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.लहान मुले महीला त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. एकीकडे प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी करतात व दुसरीकडे हजारो टन कचरा जाळून धूर निर्माण केला जातो. म्हणून सदर कचरा कुंडीतील कचऱ्यावर शासनाने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे योग्य तीप्रक्रिया करावी,कचरा पेटवू नये अशी सातत्याने मागणी या भागातील नागरीक, विदयार्थी,दवाखान्यात येणारे रूग्ण त्यांचे नातेवाईक करीत आहेत. शहरात येणारा हा कचरा डेपो शहराबाहेर हालवण्यात यावा. या मागणीचा मुख्याधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने व प्राधान्याने विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.

 

सदर निवेदन देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र यादव, रोटरी क्लबचे विकास देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, उष:काल गटाचे राहुल टकले, सूर्योदय परिवाराचे बंडोपंत लवटे, शहीद जवानचे अचुत फुले, प्रमोद कोडग, जावेद मुलाणी , संतोष महिमकर, महादेव दिवटे, प्रमोद दौंडे, विलास तलवडे बाळू तेली, प्रकाश महाजन, रमेश देशपांडे ,सुभाष दिघे, दत्तात्रय दिवटे, इसाक तांबोळी, अमर कुलकर्णी, संजय उकळे यांच्यासाह शहरातील अनेक जैष्ठ नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button