न्यू इंग्लिश स्कूल जुनि . कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल जुनि . कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय सेवा योजने चा 55 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्रा . डॉ . पांडूरंग रुपनर हे लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य केशव माने होते . यावेळी संस्था सदस्य प्रा .डॉ . अशोकराव शिंदे प्रा . दीपक खटकाळे प्रा . जयंत जानकर उपप्राचार्य प्रा . संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेची उद्दिष्टे स्पष्ट करून महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 24 सप्टेंबर 1969 ला या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या द्वारे तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी करण्यात आली असे सांगितले .. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून समाजाप्रती असणारे आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी एनएसएस महत्त्वाची भूमिका बजावते असे सांगितले .
त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची आपल्या परिसराची काळजी घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी एनएसएस सारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत . एनएसएसमुळे नेतृत्व गुणाचा विकास हो तो श्रमप्रतिष्ठा ‘ प्रामाणिकपणा , कष्ट करण्याची तयारी ‘ सकारात्मकता या गुणांचा विकास होतो असे सांगितले .आजच्या धावपळीच्या जगात माणसाला आनंदी राहणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणे आवश्यक आहे आणि तो घेत असताना त्याकडे सकारत्मकतेने पाहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले .
यावेळी संस्था सदस्य प्रा . डॉ . अशोक शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक मूल्य . राष्ट्रीय मूल्य . लोकशाही मूल्य . आपल्यामध्ये रुजवायची असल्यास आपणास राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सक्रिय सहभागी होणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे करत असताना केवळ माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी ही वृत्ती जोपासणे आवश्यक आहे असे मत मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा . सौ जुलेखा मुलाणी यांनी केले . तर आभार प्रा संतोष राजगुरु यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य केशव माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी प्रा . संतोष राजगुरू कार्यक्रमाधिकारी प्रा . मिलिंद पवार प्रा . दत्तात्रय देशमुख व एनएसएस स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले .