सांगोला: : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च,मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्र भेट आकाशवाणी केंद्र कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. आकाशवाणी केंद्र व त्याची कार्यप्रणाली याबद्दलची माहिती सहाय्यक अभियंता श्री.प्रशांत सराफ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
यामध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ , कंट्रोल रूम, लाईव्ह रूम,ट्रान्समिशन स्टेशन तसेच रिफ्लेक्टर अँटिना व मायक्रोवेव्ह लिंक अँटेना इत्यादी गोष्टींचा कार्यप्रणाली बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या शैक्षणिक भेटीमध्ये ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या भेटीदरम्यान इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाचे प्रा. राहुल पाटोळे ,प्रा. ऋषिकेश देशमुख, प्रा. दुर्गा पाटील,प्रा.निलिमा बनाळे व टेक्निकल सहाय्यक धनश्री माळी आदि उपस्थित होते.
हि शैक्षणिक क्षेत्र भेट संस्थेचे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, डीन अँकँडमीक डॉ. शरद पवार व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. धनश्री राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.