सांगोला विद्यामंदिरचा जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पुन्हा एकदा दबदबा

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोलामधील खेळाडूंनी मोडनिंब तालुका माढा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत दरवर्षी प्रमाणे सुयश संपादन करत दबदबा निर्माण केला.
यामध्ये १७ वर्ष मुले गटामध्ये बरकतअली इरफान मुलाणी (९वी) प्रथम क्रमांक,सोहम सचिन चव्हाण (८वी) प्रथम क्रमांक,१९ वर्षे मुली गटामध्ये अनुष्का संजय गायकवाड
(१२वी शास्त्र) प्रथम क्रमांक, श्रेया संगमेश्वर बामणे (१२वी कला) प्रथम क्रमांक,भारती दामोदर गायकवाड ,(१२वी वाणिज्य) प्रथम क्रमांक,महेक इरफान मुलाणी(१२वी कला) प्रथम क्रमांक मिळविला. वरील सर्व विद्यार्थ्यांची पुणे विभागस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंचा संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदिप धुकटे,मच्छिंद्र इंगोले,क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
या यशस्वी खेळाडूंना सांगोला विद्यामंदिरात ज्युनिअर कॉलेजचे प्रा.सचिन चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.याशिवाय ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी.के. पाटील, क्रीडाशिक्षक नरेंद्र होनराव,सुभाष निंबाळकर, अजित मोरे, प्रा.संतोष लवटे,यांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके ,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.