सांगोला तालुका

 भाजपा मुस्लीम विरोधी नसून मुस्लीमांना विकासाच्या प्रवाहाबरोबर नेहणारा पक्ष- श्रीकांत दादा देशमुख

श्रीकांत दादा देशमुख यांची मांजरी मस्जिद मध्ये रोजा इफ्तार पार्टीस उपस्थिती

श्रीकांत दादा देशमुख यांचा तालुक्यात संवाद दौरा व कॉर्नर सभा चालू असतानाच सांगोला तालुक्यातील मांजरी येथील मस्जिद मध्ये जाऊन पवित्र अशा रमजान महिन्यांमध्ये ज्या सत्ताविसाव्या रोजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे अशा दिवशी मुस्लिम बांधवांसोबत रोजा इफ्तार पार्टी सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी मांजरी येथील युवक व वडीलधारी मुस्लिम बांधवांनी माजी जि प सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा व त्यांच्यासोबत आलेले त्यांचे बंधू भाजपा किसान मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शकील बागवान, निसार काझी, बाळासाहेब शिंनगारे यांचे स्वागत व सत्कार केला

 

 

 

यावेळी नमाज पटनानंतर श्रीकांत दादांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की देशामध्ये पिढ्यानपिढ्या हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत आहेत मी भाजपाचा पदाधिकारी आहे मला मुस्लिम समाजात कधी तिरस्कार व विरोधाभास असल्याची भावना दिसून आली नाही परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी देशात चालू असताना काही भाजपाविरोधी असणारे पक्ष व त्यांचे नेते मताच्या झोळ्या भरण्यासाठी बुद्धीभेद करीत आहेत 52 साली दोन खासदार असलेला भाजपा पक्ष मधल्या काळात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि त्यांनी मुस्लिम समाजाला राष्ट्रपती सारख्या देशाच्या सर्वोच्च पदावर जगविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे कलाम सारख्या बुद्धिवंत मुस्लिम प्रतिनिधीला संधी दिली तर देशाच्या लोकसभेचे अध्यक्षपदी उच्चशिक्षित मुस्लिम महिला नजमा हेपतुल्ला यांची वर्णी लावून मुस्लिम समाजाचा आदर करून देशाला एक वेगळा संदेश दिला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा पहिला निर्णय म्हणावा लागेल भाजपाचे नरेंद्र मोदी या देशाचे 1914 ला परत पंतप्रधान झाले त्यांनी देशातील सर्व जाती धर्मातील गोरगरिबांसाठी काही लाभाच्या योजना लागू केल्या त्यामध्ये मोफत घरासाठी पंतप्रधान आवास योजना मोफत गॅस साठी पंतप्रधान उज्वला गॅस योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वर्षाला दोन हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना मोफत औषध उपचारासाठी पंतप्रधान आयुष्यमान योजना अशा 150 योजनांमध्ये मुस्लिम समाजाला देशभरात पात्र लाभार्थींना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतलेले आहे मग भाजपा मुस्लिम विरोधी कसा ही विरोधकांनी सांगावे माझ्या सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत एक उदाहरण सांगता येईल कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आणि 35 हाजार शहरी पंतप्रधान आवास योजनेच्या घराच्या प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे महानगरपालिकेमार्फत पाठविला त्यावेळी महापालिकेत भाजपाचा महापौर होता तर पालकमंत्री भाजपाचेच होते परंतु विरोधक आहेत म्हणून प्रस्ताव रखडत न ठेवता पंतप्रधान कार्यालयाने प्राधान्याने मंजूर केला 35 हाजार घरांमध्ये 16 हाजार मुस्लिम लाभार्थी कुटुंबे होती त्या प्रोजेक्टच्या भूमिपूजनाचे त्या माजी आमदारांचे निमंत्रणही पंतप्रधानांनी स्वीकारले त्या भूमिपूजन कार्यक्रमात जाहीर रित्या त्यांनी सांगितले की हा शहरी पंतप्रधान आवास मधला जगातील सर्वात मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकार्पण सोहळ्याला घराची चावी लाभार्थ्यांना देण्यासाठी येणार म्हणून सांगितले आणि मागील दोन महिन्यात तो लोकार्पण कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाला त्यावेळी 35 हाजार लाभार्थी बरोबर त्यांना या 16 हाजार मुस्लिम कुटुंबाच्या लाभार्थीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्यांनी मेरा देश मेरा परिवार असा नारा दिला सध्याच्या भाजपा मित्र पक्षाच्या राज्य सरकारने अल्पसंख्यांक मंत्रालयाची स्वतंत्र व्यवस्था केल्याने राज्यातील धार्मिक स्थळे मदरसे कब्रस्तान इदगाह मैदान इत्यादी जीर्णोद्वार नव्याने वास्तू बांधण्याचे कार्यक्रम हाती घेतला आहे या योजनेतून माझ्या जवळे गावातल्या इदगाह मैदानाला 25 लाख मंजूर झाले आहेत तर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी आपल्या खासदार पंडातून बऱ्याच मुस्लिम वस्तीत थायमास्ट दिवे तर जिल्हा नियोजन समिती मधून जन सुविधा व नागरी सुविधा मधून वाढवडीलांचे पावित्र्य राकनयासाठी कब्रस्तानला कंपाउंड मस्जित समोर पेवर ब्लॉक ईदगा दुरुस्ती इत्यादी मतदारसंघात मुस्लिम समाजाला निधी दिला आहे त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्रालयाकडून खासदारांनी 25 15 योजनेतून वरील कामासाठी मतदारसंघात निधी दिला असून दिला असून वेळोवेळी मुस्लिम समाजाला निर्णय प्रक्रियेत व विकास कामात बरोबरचे स्थान दिले चे विरोधकाला ठणकावून सांगितले या उर्वरित विकासासाठी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा कमळ चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आव्हाने श्रीकांत दादांनी केले.

 

ही रोजा इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य जहांगीर मुजावर शाहरुख मुजावर रेहमान सय्यद समीर मुजावर सिकंदर मुजावर रफिक मुलानी सद्दाम मुजावर मोहसीन मुजावर नशीब मुलांनी हसन तांबोळी रेहान मुलानी टिपू खाटीक दाऊद मुजावर आमिर पटेल जांबाज मुजावर अरमान मुजावर साहिल मुजावर या सर मुजावर शकलीन मुजावर जमीर मुजावर सद्दाम सय्यद अमीर मुजावर आलम सय्यद इमरान मुजावर रियाज मुजावर शकूर मुजावर अरमान मुजावर अजित मुजावर अल्ताफ मुलानी आमच्यात मुजावर समीर शेख यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!