बांधकामासाठी आणलेल्या सळई पळविल्या चोरट्यांनी
सांगोला(प्रतिनिधी):- बांधकामासाठी आणलेली 70 हजार रुपये किंमतीच्या सळई अज्ञात चोरट्यांनी मुद्दाम, लबाडीने चोरुन नेल्या असल्याची घटना 11 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कटफळ ता.सांगोला येथे घडली. चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीच्या 08 एमएम च्या 397 किलो वजनाची लोखंडी सळई व 50 हजार रुपये किंमीच्या 10, 12, 16 एमएमच्या 1196 किलो वजनाची लोखंडी सळई असा एकूण 70 हजार रुपये किंमतीच्या सळई पळवून नेल्या. चोरीची फिर्याद नितीन म्हमाणे (रा. कटफळ ता. सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
दि. 11 मार्च 2024 रोजी दुपारी 02.30 वा. सुमारास फिर्यादी नितीन म्हमाणे यांनी शेतात मौजे कटफळ ता सांगोला येथे घराचे बांधकामासाठी 08 एमएम व 16 एमएम ची लोखंडी सळई आणुन टाकली होती. त्यानंतर पहाटे 5 वा. चे सुमारास बांधकामावर परत आल्यावर बांधकामासाठी आणलेली सळई ठिकाणी दिसुन आली नाही. त्यानंतर त्यांनी आजुबाजूस पाहणी केली असता त्या ठिकाणी चार चाकी वाहनाचे वळ दिसुन आल्याने अज्ञात चोरट्याने बांधकामासाठी आणलेली सळई चोरून नेली असल्याचे खात्री झाली.