सांगोला विद्यामंदिरमध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात

सांगोला ( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांचेकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ पासून सांगोला केंद्र क्रमांक – ०४८२ सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सुरू होत आहेत. या परीक्षा केंद्रावर सांगोला विद्यामंदिर,नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज व न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचे नियमित/ श्रेणीसुधार/ खाजगी व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत अशी माहिती केंद्र संचालक शहिदा सय्यद यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रावर सकाळ सत्राच्या पेपरच्या वेळी दहा वाजता व दुपार सत्राचे पेपरच्या वेळी दोन वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, परीक्षार्थीच्या बरोबर केंद्रावर प्रवेशद्वाराच्या आत पालकांना प्रवेश करता येणार नाही, परीक्षार्थीनी लेखन साहात्याशिवाय इतर आक्षेपार्ह साहित्य तसेच मोबाईल, मौल्यवान वस्तू, बॅग आवरत आणू नये, ओळखपत्र आणि रिसीट जवळ असावे, विद्यार्थ्यांनी परीक्षेस येताना स्वतः:साठी पिण्याची पाण्याची पारदर्शी बॉटल घेऊन उपस्थित राहावे या प्रकारच्या महत्त्वपूर्ण सूचना परीक्षा केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
या परीक्षा केंद्रासाठी प्रा.प्रकाश म्हमाणे, प्रा.चिंतामणी देशपांडे, प्रा.शिवशंकर तटाळे उपकेंद्रसंचालक म्हणून काम पाहणार आहेत तर प्रा. दिलीप मस्के स्टेशनरी सुपरवायझर म्हणून काम पाहणार आहेत.
बोर्ड परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार,बिभिषण माने, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.