फॅबटेक कॉलेजच्या बी फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

सांगोला: येथिल फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शै. वर्ष २०२२ -२३ मध्ये
प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष बी फार्मसी व थेट द्वितीय वर्षातील
विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. हा
कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर
डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, यांच्या
मार्गदर्शनाखाली व संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या
उपस्थितीत पार पडला.
हा कार्यक्रम प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने तसेच द्वितीय वर्षातील
विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सांगोला रेल्वे
स्टेशनचे स्टेशन मास्टर श्री. सत्येन्द्र सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी
महाराष्ट्र हे कर्तृत्ववान महापुरुषांचे राज्य आहे. या ठिकाणी छत्रपती
शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहासच तुम्हाला कार्य करण्याची प्रेरणा
देतो. त्याचप्रमाणे भारतातील पहिल्या महिला शिक्षक सावित्रीबाई फुले
यांचे कार्य पाहून तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करून घ्यावयाचे आहे असे
यावेळी त्यांनी सांगितले.
कॅम्पसमध्ये असणाऱ्या सर्व सोयी-सुविधेबद्दलची माहिती कॅम्पस
डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना बी फार्मसीचे दूरगामी होणारे फायदे सांगून प्रवेश
घेतलेल्या सर्व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बी फार्मसी
विभागाचे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. उपस्थित सर्व
विद्यार्थ्यांना विभागप्रमुख व स्टाफ यांची ओळख करून देण्यात आली. तसेच
विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग, प्रयोगशाळा, लायब्ररी, ऑफिस, इत्यादी
विभागांची माहिती करून दिली. पूर्ण वर्षाचे शेड्युल यावेळी
विद्यार्थ्यांना सांगितले.
या वेळी फणी गेम्स, गीत नृत्य व संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यात
आला. सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमात
मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर यांची निवड करण्यात आली.मिस फ्रेशर म्हणून
कु. शिवानी सुरवसे व मिस्टर फ्रेशर म्हणून अनिकेत शिंदे यांची निवड
करण्यात आली. मा. प्राचार्य यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाचे
नियोजन प्रा. श्रीनिवास माने, प्रा.शिरीष नागनसूरकर,प्रा. एस एम
काझी,प्रा.अमोल पोरे यांनी केले.