सांगोला तालुका

*सांगोला लायन्स क्लबकडून गुरुजनांच्या आरोग्याची काळजी; गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदाब व रक्तशर्करा मोफत तपासणी शिबिर

सांगोला ( प्रतिनिधी) गुरूपौर्णिमेनिमित्त सांगोला लायन्स क्लबने गुरुजनांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब तपासणी व आरोग्य सल्ला शिबीर घेत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
 माजी प्रांतपाल  ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब सांगोला  व डोंबे हॉस्पिटल यांच्या वतीने सांगोला येथे १०० पेक्षा जास्त गुरुजनांची रक्त शर्करा व रक्तदाब तपासणी करण्यात येऊन  गुरुजनांना आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
    यावेळी व्यासपीठावर माजी प्रांत ३२३४ड१माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, डोंबे हॉस्पिटलचे डॉ.शैलैश डोंबे, डॉ.सौ.जीवनमुक्ती डोंबे, सांगोला विद्यामंदिरचे प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर,प्रांत ३२३४ ड१ रिजन १ झोन ५ चे झोन चेअरमन ला. प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.
    या शिबिरासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज  उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक बिभिषण माने, सांगोला लायन्स क्लब सचिव अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, लायन्स क्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व आभार अध्यक्ष उन्मेश आटपाडीकर यांनी केले
लायन्स क्लब व डोंबे हॉस्पिटल यांचे वतीने  घेण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून  गुरूपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे, यांचा आनंद आहे. सांगोला विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी डॉ. शैलेश डोंबे व जीवनमक्ती डोंबे यांनी शिक्षकगुरूजनांच्या आरोग्यासाठी शिबिराच्या माध्यमातून दिलेले योगदान प्रत्येक शिक्षकांसाठी उत्तम आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वापूर्ण आहे.
 *- प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, माजी प्रांतपाल*
 *चौकट -२* या शिबिरातून शिक्षकांना साखरेच्या आजाराविषयी माहिती  होईल तसेच आजाराचे स्वरूप गंभीर होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना करता येईल.त्याचबरोबर आरोग्य संदर्भातला हा महत्त्वपूर्ण विचार  शिक्षकांचा समाजाशी संपर्क पाहता खूप लोकांपर्यंत जाईल असे वाटते. यानिमित्ताने आपण सर्वांनी निरोगी आरोग्यासाठी दररोज पंचेचाळीस मिनिटे चालणे, पुरेशी झोप व मन प्रसन्न ठेवणे या त्रिसूत्राचा अवलंब करावा.
 *डॉ. शैलेश डोंबे*डोंबे हॉस्पिटल सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!