फीनिक्स प्रशालेत आज ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ८ वाजता प्रशालेच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे संस्था अध्यक्ष – श्री येडगे सर तसेचे तिन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर प्रमुख पाहुणे व पालक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत , झेंडागीत, राज्यगीत गायले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि नृत्याचे कार्यक्रम सादर केले. लहान मुलांनी रंगीत पोषाखात ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देत उपस्थितांचे मन जिंकले. तसेच, सर्व विद्यार्थ्यांनी संगीत मय कवायत प्रकार व संगीतमय लेझीम नृत्य ही सादर केले व लहान मुला – मुलींची भाषणे, बडबड गीते, ही सादर केली . त्याचबरोबर प्रशालेमध्ये भाई मा .आमदार डॉ . गणपतरावजी देशमुख यांच्या ९८व्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व बुद्धीबळ स्पर्धा प्रशालेमध्ये घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेत नंबर आलेल्या मुला – मुलींना ट्राफी व प्रशस्तीपत्रक ‘ रोख रक्कम बक्षीस पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली ..आणि तसेच सन २०२४ – २५ मध्ये झालेल्या शिष्यवृती परीक्षेत नंबर आलेल्या मुलांचेही बक्षीसे देऊन सत्कार करण्यात आला .व
कार्यक्रमाच्या शेवटी श्री टकले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना शिस्त, राष्ट्रप्रेम आणि देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून झाली.
हा सोहळा पाहून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. संपूर्ण शाळेचे प्रांगण तिरंग्याच्या रंगांनी आणि देशभक्तीच्या घोषणांनी भारलेले होते.