अस्तित्व संस्थेच्या वतीने ग्रामीण भागांतील 61 मुलींना सायकलींचे वाटप

ग्रामीण भागांतील मुलींनी शिक्षण घेउन उच्च पदे काबीज केली पाहिजेत-कबिर गायकवाड
ग्रामीण भागांतील मुलींनी शिक्षण घेउन उच्च पदे काबीज केली पाहिजेत असे मत अटलास कॉप को इंडिया लिमिटेड चे कबिर गायकवाड यानी मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केलं.अटलास कॉपको इंडिया लिमिटेड व सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या संस्थांच्या सहकार्याने अस्तित्व संस्थेच्या वतीने काल बंधन पॅलेस येथे सांगोला व मंगळवेढा तालुक्यांतील गरीब व गरजू मुलींना विशेषतः वाड्यावस्त्यावरून पायी शाळेत येणा जाणाऱ्या मुलींना काल बंधन पॅलेस वाढेगाव रोड येथे डॉ.निकिता देशमुख, अभिजित पाटील, अमित देशपांडे, डॉक्टर प्रभाकर माळी, अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले त्या कार्यक्रमांत अटलास कॉपको इंडिया लिमिटेड चे कॉर्पोरेट एच आर प्रमुख कबिर गायकवाड बोलतं होते.ते पूढे बोलताना म्हणाले मुलींनी सावित्रीचा वसा पूढे चालवायचा असेल तर प्रथम शिक्षण घेतले पाहिजे शिक्षणाशिवाय स्वतःची व कुटुंबाची प्रगती होत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी शिक्षण घेतले पाहिजे. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर निकिता देशमुख म्हणाल्या की मुलींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे सकस आहार घेतला पाहिजे त्यानी उपस्थित मुलींना बोलते केले अनेक मुलींनी मी आय पी एस, पोलीस, तसेच कलेक्टर होणार असे सांगितले. यावेळी सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया चे मुख्याधिकारी अमित देशपांडे यानी सायकल वाटपा मागची भूमिका मांडली तसेच अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी प्रास्ताविक केले अटलास कॉपकोच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षांपासून चालू असलेल्या कार्यक्रमावर त्यांनी मांडणी केली. त्यानंतर मुलींना सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण सुर्यागंध, दीपाली भुसनर, नितीन वाघमारे, खंडेराव लांडगे, विजय धनवडे, विशाल काटे, माधुरी मंडले, अक्षता सोनवणे, संकल्प गडहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास अनेक गावचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, मुलींचे पालक तसेच माणदेशी फाऊंडेशनच्या मनिषा मोरे, अर्चना खरचे व बहुसंख्येने पालक, शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते शेवटी आभार अँड.सुनिता धनवडे यांनी मानले तर सूत्रसंचलन जितेश कोळी सर यांनी केले
अस्तित्व संस्थेच्या वतीने सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले त्यामध्यें प्रगती विद्यालय वाणीचींचाळे, गुरूदत्त विद्यालय वाकी, मानेगाव हायस्कूल मानेगाव, जिल्हा परिषद शाळा हटकर मंगे वाडी व स्वामी विवेकानंद विद्यालय गोने वाडी या शाळांतील मुलींचा समावेश होता या पुढेही हा उपक्रम आम्ही सूरु ठेवणार असुन जास्तीत जास्त गरीब व गरजू मुलींना शिक्षणासाठी हातभार लावणार आहोत – शहाजी गडहिरे