वासुद येथील संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य व सायकलचे वाटप

सांगोला(प्रतिनिधी):- वासुद येथील संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केदारवाडी,बाबरसपताळमळा वासुद आणि हनुमान विद्यालय वासुद येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलीचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी पेरूची रोपे देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सहा.पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी मुलांना स्पर्धा परीक्षाचे महत्व सांगत वैज्ञानिकांच्या मते 33 टक्के जंगल असावे, परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्यात फक्त 20 टक्के जंगलव्याप्त भाग आहे.पाऊस पाणी जादा पडण्यासाठी निसर्गाचा समतोल राखला पाहिजे म्हणून झाडे लावली पाहिजेत, असे आवाहन केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी संकल्पच्या निसर्गप्रेमी पदाधिकार्यांचे कौतुक केले.
भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिह केदार यांनी संस्थेच्या 19 वर्षाच्या कामकाजाचा आढावा सांगत वासुद गावातील तरुण उद्योग क्षेत्रात, प्रशासनात आहेत, गावाचा नाव लौकिक वेगवेगळ्या क्षेत्रात करत असून आपल्या मान मातीचे ऋण लक्षात ठेवून गावासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत असे मत मांडून गावाबाहेर गावाचे नावलौकिक करून सामाजिक कामे करणार्या तरुणांना प्रोत्साहन दिले असे सांगितले.
यावेळी प्रसिद्ध कवी सुनील जंवजाळ सर यांनी मुलांच्या आवडीनुसार करिअर करू द्यावे व पालकानी इच्छा लागू नये असे मार्गदर्शन केले.त्यांनी रसाळ वाणीत कविता गायन करून विद्यार्थ्यांनी पालकाचे प्रबोधन केले.कृषी सहाय्यक बाळासाहेब सावंत यांनी संकल्प संस्थेच्या पुढील कार्याविषयी माहिती दिली.
कृषी सहाय्यक उत्कर्ष चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत केदार, खजिनदार सदानंद शिंदे, उपाध्यक्ष मेजर भीमराव सावंत , सचिव मेजर सुखदेव सपताळ उपस्थित होते.
संकल्प संस्थेला उद्योजक सुदाम भुरे हे मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. संस्थेचे कामकाज व मायक्रो प्लॅनिंग सचिन शिंदे, शिवाजीराव खटके, पोपटराव केदार, आबासाहेब इंगोले, पुण्यवंत खटकाळे यांनी केले.
कार्यक्रमात सौ प्रियांका जगदीश केदार यांची शिक्षिका म्हणून नेमणूक, नूतन पदवीधर शिक्षक किरण केदार यांचा सत्कार तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शशिकांत केदार गुरुजी यांची दोन्ही मुले महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाले धनंजय केदार हे पीडब्ल्यूडी मध्ये कनिष्ठ अभियंता तर दुसरा मुलगा मनोज हा जलसंपदा विभागांमध्ये कॅनॉल इन्स्पेक्टर पदावर रुजू झाला म्हणून वडिलांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील शिक्षक सतीश सुखदेव सपताळ यांची शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली म्हणून सत्कार करण्यात आला.
संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला तात्यासाहेब केदार, सुदाम भोरे , विष्णुपंत केदार , सदानंद शिंदे, भीमराव सावंत व पोपट केदार यांनी संस्थेला नेहमी मदत केलेली आहे.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सरपंच अरुण केदार, उपसरपंच अनिल केदार, सौरभ केदार, नवनाथ केदार, सरदार केदार, प्रवीण केदार, रोहित केदार, दीपक केदार, विराज चौधरी, दाजी आदलिंगे यांनी मेहनत घेऊन सहकार्य केले.