पाणी वेळेत द्या नाहीतर तीव्र आंदोलन करू: अँड सचिन देशमुख
सांगोला :- गेले तीन महिने झाले टेंभू योजनेचे पाणी कोळे भागातून कॅनॉल द्वारे वाहत आहे परंतु कोळे व परिसरातील लोकांना पिण्याचे पाणी पाच ते सहा दिवसानंतर मिळत आहे भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन लोकांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे याकडे ना प्रशासन लक्ष देते! ना लोकप्रतिनिधी लक्ष देतात ! अशी अवस्था या भागातील लोकांची झाली आहे गेले तीन महिने झाले कोळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे यासाठी कोळा ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहण करण्यासाठी तहसीलदार व प्रांत आधिकरी यांना निवेदन दिले आहे, टँकरचे पाणी मिळावे म्हणून मागणी केली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे म्हणजे एमजीपी चे पाणी मिळावे म्हणून प्रयत्न केले आहे तसेच टेंभू योजनेचे पाणी कोळे ओढ्यात सोडून विहिरी भरून घेतलं तरीसुद्धा पिण्याचे पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना पण सुटणार आहे याकडेही प्रशासनाने ,लोकप्रतिनिधीने, आणि विरोधी पक्षांनी सर्वांनीच कानाडोळा केल्याने येथील भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे
कोळा ग्रामपंचायतीने खाजगी विहिरीधारकां कडून पाणी विकत घेऊन सुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही लोकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सांगोला तालुक्यातील अतिशय महत्त्वाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ही योजना सध्या या भागासाठी बंद आहे या योजनेतून पाणी मिळणे गरजेचे आहे परंतु तेथील पाईपलाईन अजून दुरुस्त झाली नसल्यामुळे लोकांना पाणी उशाला असून सुद्धा कोरड घशाला पडले आहे असे चित्र निर्माण झाले आहे या संदर्भात कोळा ग्रामपंचायतीने आणि ऍड सचिन देशमुख यांनी तहसीलदार प्रांत महाराष्ट्र प्राधिकरणाच्या अधिकारी यांच्याकडे पाणी मागणी विविध अर्ज विनंती केले आहेत परंतु कोणीही याकडे कोण ही लक्ष देत नाही कारण या भागांमध्ये कित्येक दिवस झाले लोकं पाण्यासाठी वणवण फिरत आहेत वारंवार मागणी करत आहेत परंतु सर्वजण झोपेचे सोंग घेऊन गप्प बसला आहे आबासाहेब असते तर या काळामध्ये मोठे आंदोलन करून पिण्याचा पाण्याचा प्रश्न नक्की सोडवला असता त्यांची उणीव या काळात जाणवत आहे
सध्या तालुक्याचे आमदार एड. शहाजी बापू पाटील आहेत हे मुख्यमंत्र्याचे अत्यंत जवळच आमदार आहेत परंतु त्यांचेही टेंभू योजनेचे अधिकारी पाणी सोडण्याचे बाबतीत ऐकत नाहीत असेच म्हणावे लागेल कारण ज्या ज्या वेळेस आमदार यांच्याकडे लोक भेटतात त्यावेळेस पाणी सोडण्यासाठी दोन-तीन दिवसात पाणी येईल अशा आश्वासन दिले जाते परंतु प्रत्यक्षात त्या आश्वासनावर कोणतेही कार्यवाही होत नाही तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे अधिकारी सध्या आमदार साहेबांचे कोणतेही प्रकारचे ऐकण्यात असेच म्हणावे लागेल कारण या योजना असून अडचण नसून खुळांबा झाला आहे लोकांना पाणी मिळावे
या भागातील पाणी प्रश्न मिटवायचा असेल तर कोळे ओढ्या मार्गे बुद्धीहाळ तलाव भरून घेण्यात यावे यामुळे या भागातील पिण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न संपूर्ण मिटेल व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास यश प्राप्त होईल अशी मागणी लोकांमधून होत आहे.आणि जर पाणी सोडले नाहीतर आम्ही आंदोलन करू असा इशारा ऍड सचिन देशमुख यांनी दिला आहे