गुढीपाडव्यानिमित्ताने जवळे येथील मारुती मंदिरात पाडव्याचे वाचन.

जवळे( प्रशांत चव्हाण) गुढीपाडव्यानिमित्ताने जवळ येथील श्री मारुती मंदिरात परंपरेनुसार पाडव्याचे वाचन करण्यात आले. सदरची गुढीपाडवा वाचनाची परंपरा ह भ प कै.शारदादेवी काकी साळुंखे-पाटील यांच्या कृपाआशीर्वादाने जवळेकर ग्रामस्थ आज ही जपत आहेत.
तसेच परंपरेचा वारसा म्हणून सायं7 ते 9 या वेळेत भागवत कथा ग्रंथाचे वाचन नियमितपणे चालू आहे.गुढी पाडव्यानिमित्ताने पाडवा वाचनाचा कार्यक्रम सकाळी9ते10.30 या वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदरचे पाडवा वाचन जवळे येथील प्राथमिक शिक्षक श्री.सुनील कुलकर्णी यांनी विस्तृतपणे केले नवीन वर्षात येऊ घातलेल्या फलाचे करताना श्री.सुनील कुलकर्णी गुरुजी यांनी सांगितले की चालू वर्षी मेघ निवास वाण्याच्या घरी असून मोजकीच पर्जन्यवृष्टी होईल. सदर प्रसंगी जवळे पंचक्रोशीतील शेतकरी बांधव ग्रामस्थ उपस्थित होते.