सचिन हॉस्पिटल मिरज येथे रविवारी मोफत वंध्यत्व निवारण शिबीर

शहरातील शिवाजी रोडवर असलेल्या सचिन हॉस्पिटलमध्ये रविवारी 25 जून रोजी सकाळी नऊ ते चार यावेळेत मोफत वंध्यत्व निवारण व स्त्रीरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये वंध्यत्वाची कारणे, उपचार व स्त्राrरोग यावर अत्याधुनिक मशिनवर तपासणी करुन मोफत सल्ला दिला जाणार असल्याची माहिती डॉ. सचिन सुगाण्णावर यांनी दिली.
सचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुल न झालेल्या दाम्पत्यांना व fिस्त्रयांमधील विविध आजारांवर हॉस्पिटलच्या वतीने उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहोत. असे डॉ. सुगाण्णावर म्हणाले. हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत अशा प्रकारची शेकडो मोफत शिबीरे घेण्यात आली असून, त्याचा लाभ हजारो रुग्णांना झाला आहे. या शिबीराच्या माध्यमातून मुल न झालेल्या दाम्पत्यांच्या दोषा विषयी मार्गदर्शन व टेस्टटय़ूब बेबी सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येते.
विशेषत गर्भाशयात प्रक्रिया केलेल्या शुक्राणुंचे रोपण, वीर्यपेढी स्त्रीबीज दान, गर्भ गोठवून ठेवणे, आय.व्ही.एफ. आय. सी. एस. आय. आय. एम. एस. आय. व व्हेरिपिकेशन याचबरोबर बंद गर्भनलिका चालु करणे, स्त्रीबीज तयार न होणे यावर मार्गदर्शन करण्यात येते. पुरूष वंद्यत्वामुळे शुक्राणुमधील दोष संख्या कमी असणे, ताकद कमी असणे, शुक्राणु मृत असणे, लैगिक समस्या यावर आधुनिक उपचाराची व मायक्रोसर्जरीची माहिती या शिबीरात दिली जाते.
गर्भाशयाच्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रीयेची गरज असल्यास आधुनिक पध्दतीने व कमी खर्चामध्ये शस्त्रक्रीया करण्याची सोय उपलब्ध आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील अनेक रुग्णांना हॉस्पिटलमधील औषधोपचार व टेस्टटय़ूब बेबी या तंत्रज्ञानाने अपत्य प्राफ्तीचे भाग्य लाभले आहे. असेही डॉ. सचिन सुगण्णावर म्हणाले.