सांगोला पोलीसांकडून गहाळ झालेले 19 मोबाईल तक्रारदारांना परत

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणाहून दिनांक 01 मार्च 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 रोजीपर्यंत एकूण 32 मोबाईल गहाळ झालेल्या घटना घडल्या होत्या. सदर गहाळ झालेल्या मोबाईलचा सायबर पोलीस ठाणे यांचे मदतीने तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेवुन गहाळ झालेल्या एकुण 22 मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकुण 19 मोबाईल अंदाजे किमंत 3 लाख 05 हजार रु मिळून आल्याने ते तक्रारदारांना मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. मंगळवेढा विभाग व पोलीस निरीक्षक सांगोला यांचे हस्ते सांगोला पोलीस ठाणे येथे परत करण्यात आले आहेत.
सदरची कामगीरी मा. शिरीष सरदेशपांडे पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. प्रतिम यावलकर अपर पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली भिमराव खणदाळे पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे, पोहेकों युसुफ पठाण, पोकों रतन जाधव दोघे तेम. सायबर पोलीस ठाणे, पोकों शहाजहान शेख नेम.सांगोला पोलीस ठाणे यांनी केली आहे. सदर कारवाईमुळे तकारदार यानी समाधान व्यक्त केले आहे. या पुढे मोबाईल गहाळ , हरविले असल्यास त्यानी तात्काळ पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवावी असे अवाहन सांगोला पोलीस ठाणे तर्फे करण्यात येत आहे.