प्रत्येक पुरस्कार हा आपल्या सर्वांच्या कष्टाचे फळ आहे- प्रा. प्रबुद्धचंद्र झपके

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या आपल्या संस्थेला विविध ठिकाणचे पुरस्कार मिळत आहेत.या पुरस्काराच्या पाठीमागे विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे परिश्रम आहेत, म्हणूनच मला मिळणारा प्रत्येक पुरस्कार हा आपल्या सर्वांच्या कष्टाचे फळ आहे असे प्रतिपादन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.
स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या नावाचा पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना मिळाल्याबद्दल नाझरा विद्यामंदिर परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या समारंभात सत्कारास उत्तर देताना ते ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य अमोल गायकवाड, नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. झपके म्हणाले की, आपल्या संस्थेतील प्रत्येक शिक्षक अतिशय तळमळीने व निष्ठा ठेवून अध्यापनाचे कार्य करत आहे.त्यामुळे आपल्या संस्थेचा उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज केला जात नाही,आपण सर्वजण या पुरस्काराचे भागीदार आहात, हा पुरस्कार आपणास सर्वांनाच आहे मी निमित्त मात्र आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मंगल पाटील दिलावर नदाफ व गुणवंत लिपिक पुरस्कार मिळाल्याबद्दल हेमंत नलवडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.