महाराष्ट्र

कवी अनंत राऊत यांच्या काव्यमय समाजप्रबोधनाने विद्यार्थी भावूक; सांगोला महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत (अकोला)  यांच्या काव्यमय समाजप्रबोधनाने उपस्थित विद्यार्थ्यांसह श्रोते चांगलेच भावूक झाले, निमित्त होते  येथील सांगोला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभचे. या महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले यावेळी  कवी अनंत राऊत प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, तिच्या एका इशाऱ्याने,  भोंगा वाजलाय या सारख्या त्याच्या कवितांना श्रोत्यांनी अक्षरशा डोक्यावर घेतले. त्यांचे शब्दावरील प्रभुत्व आणि हृदयस्पर्शी काव्यमय समाजप्रबोधन यामुळे  श्रोते चागलेच भावूक झाले

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके यांनी भूषवले. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, संस्था सदस्य महादेव झिरपे(सर), विश्वनाथ चव्हाण, शामराव लांडगे, सुरेश फुले, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष प्रा.संतोष लोंढे, वैजनाथ घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या विद्यार्थी स्नेहसंमेलनामध्ये दि.१७ फेब्रुवारी रोजी आयोजित शेलापागोटे कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.सुरेश भोसले यांचे हस्ते करण्यात आले. रांगोळी प्रदर्शन  ॲड. गजानन भाकरे, संस्थासचिव ॲड.उदय(बापू) घोंगडे यांचे हस्ते करण्यात करण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन स्तर पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ॲड. भाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेलेया विविध गुणदर्शन कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

मंगळवार दि. १८ फेबुवारी रोजी झालेल्या संगीत शेलापागोटे कार्यक्रमाचे उदघाटन सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रेरणा आणि गलक्सी भिंतीपत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कवी अनंत राऊत हस्ते करण्यात  आले. यावेळी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक, विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी, सांस्कृतिक, युवा महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा, रांगोळी, कथाकथन, काव्यवाचन, निबंध व वकृत्व इत्यादी यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले. स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.संतोष लोंढे यांनी अहवाल वाचन केले. पाहुणे परिचय डॉ. रामचंद्र पवार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.संतोष कांबळे यांनी केले. परीक्षक सहशिक्षक अमोल माहिमकर, सहशिक्षिका सौ. अनुपमा गुळमिरे, प्रा.सौ.वसुंधरा निंबाळकर, डॉ.विजयकुमार गाडेकर, नगरसेविका सौ. शोभा घोंगडे, सौ. विद्या पाटणे यांचेसह सर्व संस्था पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक, साहित्यप्रेमी नागरिक, पत्रकार, सेवानिवृत्त प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, विद्यार्थी  उपस्थित होते. हे विद्यार्थी स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रभारी  प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, कार्याध्यक्ष प्रा.संतोष लोंढे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रामचंद्र पवार, अधिक्षक प्रकाश शिंदे यांचेसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button