महाराष्ट्र

सांगोला पोलिसांकडून अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक; ०८ मोटार सायकली जप्त

 

 

सांगोला:- मोटार सायकल चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद करून बुलेटसह ०८ मोटार सायकली जप्त करुन ६,२०,०००/- मुददेमाल हस्तगत करण्यात सांगोला पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती  पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

 

 

सांगोला पोलीस ठाणे हददीत सांगोला शहर व ग्रामीण भागात मोटार सायकली चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या या घटनाना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुशगाने सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. २४५/२०२५ बी एन एस कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीता असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सांगोला शहरात जत तालुक्यातुन आरोपीत मजकुर येवून सदरच्या मोटार सायकल चोरी करतात अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेणेकामी एक पथक नेमुन सदरचे पथक जत तालुक्यात सुमारे दोन दिवस पाळत ठेवून आरोपीत मजकुर यांचा शोध घेतला असता त्यांना आरोपी नामे गोविंद उर्फ पवन राजु काळे रा. लक्ष्मीनगर, उमराणी तांडा, जत, ता. जत, जि. सांगली यास ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगोला शहरातुन तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे व मोहोळ पोलीस ठाणे या पोलीस ठाणे हददीत मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करुन त्यांचेकडून ०५ बुलेट मोटार सायकल व ०३ इतर मोटार सायकल असे एकुण ६,२०,०००/- रुपये किंमतीच्या ०८ मोटार सायकली जप्त करण्यात आलेले आहेत.

 

सदर मिळून आलेल्या मोटार सायकलीबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे, मोहोळ पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांचे अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या ०८ मोटार सायकली पुढील तपासकामी पंचासमक्ष जप्त केल्या आहेत व पुढील तपास पो. ना. बाबासाहेब पाटील हे करीत आहेत. सदर मोटार सायकली हस्तगत करण्याची कामगिरी श्री. अतुल कुलकर्णी साहेब, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री.प्रितम यावलकर साो, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. विकांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा, पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/१४२५ बाबासाहेब पाटील, पोकों / ३३५ लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/०५ युसूफ पठाण यांनी मदत करून सदर चोरीच्या मोटार सायकली हस्तगत केलेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button