महाराष्ट्र
सांगोला रोटरी क्लबतर्फे महिला दिनानिमीत्त शेतमजूर महिलांना साहित्य वाटप…

सांगोला रोटरी क्लबचा १२५ वा उपक्रम जागतिक महिला दिनाच्या दिवशी साजरा केला..त्या पार्श्वभूमीवर सांगोला रोटरी क्लब व इनरव्हील क्लब यांच्या तर्फे महिला दिन आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला..शेतात काम करणाऱ्या शेत मजूर महिला कामगारांना रोजच्या गरजेच्या वस्तूचे वाटप करण्यात आले.
उन्हात काम करताना लागणाऱ्या चप्पल,सनकोट व रोटरी चे कॅलेंडर देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे यांनी केले त्यांनी या रोटरी वर्षात सांगोला क्लबचे आतापर्यंत १२५ उपक्रम घेतल्याचा आवर्जून उल्लेख केला. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.स्वाती अंकलगी यांनी महिला दिनाची माहिती दिली. रो.डॉ.प्रभाकर माळी यांनी उपस्थित महिलांना आरोग्य आर्थिक कौटुंबिक जबाबदारी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी रो.सौ.प्रतिमा माळी यांचे सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन रो. सुरेश अप्पा माळी यानी केले.कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार देऊन करण्यात आली..
या प्रसंगी सांगोला क्लबचे रो.इंजि. विलास बिले,रो.इंजि.अशोक गोडसे,रो.गोविंद दादा माळी,रो. रो.श्रीपती आदलिंगे,रो.विजय म्हेत्रे ,रो.इंजि.संतोष गुळमिरे तसेच इनरव्हील क्लब सांगोलाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.