सांगोला रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रो. इंजि.विकास देशपांडे
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ सांगोला या संस्थेच्या वर्ष २०२४-२५ साठी अध्यक्षपदी रो. इंजि.विकास देशपांडे ,सचिव पदी रो.इंजि.विलास बिले व खजिनदार पदि रो.मिलिंद बनकर यांची सर्वानुमते निवड झाली.
यांचा कार्यकाल १जुलै २०२४ पासून सुरू होईल.रोटरी क्लब सांगोला चे यावर्षीचे हे २३ वे वर्ष आहे.या संस्थेने सांगोला तालुक्यात सामाजिक क्षेत्रात काम करून वेगळा ठसा उमटवलेला आहे. रोटरी वर्ष २०२४-२५ साठी निवड झालेल्या रोटरीच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

यावर्षीचे डिस्टिक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू जालना यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी संपूर्ण रोटरी डिस्टिक्ट मध्ये काम होणार आहे. रोटरी डिस्टिक्ट ३१३२ मध्ये ११ जिल्ह्याचा समावेश आहे व साधारणपणे ९१ क्लब त्या अंतर्गत काम करतात.सांगोला क्लब ला असिस्टंट गव्हर्नर रो.विश्वास आराध्ये पंढरपूर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

रोटरी क्लब ऑफ सांगोला वर्ष २०२४-२५ च्या डायरेक्टर पदी खालील सदस्यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.
रो.श्रीपती आदलिंगे,रो. इंजि.हमीद शेख , रो.इंजि.अशोक गोडसे रो.दीपक जी चौथे ,रो. इंजि.मधुकर कांबळे ,रो.गोविंद माळी ,रो. इंजि.संतोष भोसले ,रो. साजिक राव पाटील सर,रो. महेश गवळी रो. इंजि.संतोष गुळमिरे ,रो.डॉ.मच्छिंद्र सोनलकर ,रो.विजय म्हेत्रे,रो.गुलाबराव पाटील सर,रो. निसार इनामदार सर,रो.डॉ.इरफान तांबोळी, रो.धनाजी शिर्के,रो.माणिक भोसले सो,रो. शरणाप्पा हळळीसागर, व महिला सदस्य रो. सौ.प्रतिमा ताई माळी.

नूतन अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी याप्रसंगी सांगितले की यावर्षी सांगोला तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात रोटरी मार्फत काम करून जास्तीत जास्त लाभार्थींना फायदा करून देण्यात येणार आहे. महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे अमरधाम उभारणी.ज्या ठिकाणी अंतिम संस्कार साठी अमरधामची सोय नसेल अशा ठिकाणी रोटरी मार्फत मोफत अमरधाम बांधून देण्यात येणार आहे. शालेय मुलींमध्ये असणारा ऍनिमिया हा आजार रोटरीच्या माध्यमातून निर्मूलन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी मदत, महिला व बालसंगोपन,वृक्षारोपण, मेडिकल चेक अप कॅम्प,वृद्धांसाठी कार्यक्रम ,शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी कार्यक्रम ,नेत्र तपासणी ,शालेय साहित्य वाटप असे अनेक लोक उपयोगी उपक्रम यावर्षी राबविण्यात येणार आहेत.
रोटरी ने जगभरातून पोलिओ निर्मूलनाचे काम केले आहे.तसेच रोटरीच्या सेव्हन एरिया ऑफ फोकस अंतर्गत जलसंधारण,महिला व बालकल्याण,आरोग्य,पर्यावरण,शां तता, निसर्ग संवर्धन,आर्थिक साक्षरता, स्वच्छता व हायजिन इत्यादी विषयावर काम करण्यात येणार आहे.



