सेवानिवृत्त शिक्षक देवदत्त केदार यांचा स्वामी समर्थ ग्रुप तर्फे सत्कार संपन्न
सांगोला – हनुमान विद्यालय वासुद येथील सेवानिवृत्त शिक्षक देवदत्त केदार यांचे शैक्षणिक कार्य अनमोल असून त्यांनी आपल्या सेवा काळात विज्ञान व गणित विषयाच्या अध्यापनातून विद्यार्थी वर्गास विज्ञाननिष्ठ बनविण्याचे मोलाचे कार्य केले आहे,असे विचार प्रा.राजाभाऊ ठोंबरे यांनी व्यक्त केले.
केदार सर कालच्या ,३१ मे रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.त्या ,त्या बद्दल सांगोला शहरातील जुना मेडशिंगी रोड वरील स्वामी समर्थ नगर येथील नागरिकांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. या वेळी केदार सर व त्यांच्या सुविद्य पत्नी उत्कर्ष प्राथमिक विद्यालय सांगोला येथील शिक्षिका गंगाताई पवार यांचा सत्कार तानाजी शिंदे व पुष्पा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
केदार सर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून कुटुंबाची प्रगती. केली.दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले असे सांगून विलास पाटील सर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्काराबद्दल केदार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.या प्रसंगी शुभम ज्वेलर्सचे घाडगे साहेब,संजय खिस्ते,बंडोपंत लेंडवे सर,सौ.पुष्पा शिंदे आदि उपस्थित होते.