300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळवा, असा करा या योजनेसाठी अर्ज
अर्थमंत्र्यांनी आज बजेट सादर करताना एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ झालेल्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावी आणि काय आहेत त्याच्या अटी आणि शर्ती जाणून घ्या.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची त्यांनी माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत आतापर्यंत 1.28 कोटी नोंदणी आणि 14 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेतून तुम्हाला 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. ही योजना काय आहे. जाणून घ्या.
काय आहे प्रधानमंत्री सूर्य मोफत वीज योजना?
15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातू देशातील सुमारे 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत तुम्हाला सौर पॅनेल खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने घराच्या छतावर विजेसाठी सौर पॅनेल विकत घेतले तर सरकार 1 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 30,000 रुपये, 2 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट सौर पॅनेलवर जास्तीत जास्त 78,000 रुपये अनुदानाची रक्कम दिली जाते.
तुम्ही कसा घेऊ शकता फायदे?
या योजनेचा लाभ कसा मिळणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pmsuryaghar.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावून होम पेजवर Apply For Rooftop Solar वर क्लिक करावे लागेल. नंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडण्याचा पर्याय मिळेल, यामध्ये तुम्ही तुमचे राज्य निवडा. तुम्ही तुमची वीज वितरण कंपनी निवडा. आता त्यात तुमचा मोबाईल आणि ग्राहक क्रमांक टाका. त्यानंतर मोबाईलवर मिळालेला ओटीपी टाका, कॅप्चा भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचा रुफटॉप सोलरसाठी अर्ज सरकारकडे जमा होता. ऑनलाइन अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर, वीज बिल, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, फोटो, प्रतिज्ञापत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.