सांगोला नगरपरिषद शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक बिनविरोध

सांगोला शहर पथविक्रेता निवडणूक बिनविरोध पार पडली. यात सात सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी घोषित केले. सोलापूर जिल्ह्यातील शहर पथविक्रेता समिती सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम दिनांक 14 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी सांगोला नगरपरिषद शहर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

शहर पथविक्रेता समिती पथविक्रेत्यांच्या एकूण 8 सदस्य पदांच्या निवडणुकी करता प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रापैकी 7 नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले. वैध नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आलेल्या उमेदवारांना दिनांक 09 सप्टेंबर रोजी दुपारी 03 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत होती. विहित वेळेत प्राप्त 07 उमेदवाराने नामनिर्देशन पत्र मागे घेतले नाहीत. तसेच कोणताही आक्षेप नसल्याने सर्व नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले.

या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सदरील निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
यामध्ये सिद्धेश्वर शंकर लिंगे (सर्वसाधारण), श्री प्रशांत राजकुमार तोरगळे (सर्वसाधारण), श्रीमती अंजना विजयकुमार गायकवाड (सर्वसाधारण महिला), श्रीमती शोभा सुब्राव बनसोडे (अनुसूचित जाती महिला), श्रीमती रुक्साना रज्जाक बागवान (अल्पसंख्यांक महिला), श्री ताजुद्दीन इकबाल बागवान (विकलांग) व श्री बापू सिद्धेश्वर कोळेकर (इतर मागास वर्ग) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सह निवडणूक निर्णय अधिकारी श्री स्वप्निल हाके, पथविक्रेते व नागरिक उपस्थित होते. सदरील निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल सर्व पथविक्रेता मतदारांचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री योगेश गंगाधरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button