नंदेश्वर येथील सानिका शिंदेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नंदेश्वर ता मंगळवेढा येथील श्री बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेली सानिका लक्ष्मण शिंदे हिची १९ वर्षे वयोगटातुन यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या निवडीबद्दल तिचे अभिनंदन प्राचार्य भारत बंडगर यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांनी केले आहे.