मराठी पत्रकार संघाच्यावतीने सांगोल्यात वारकर्यांना फराळाचे वाटप

सांगोला (प्रतिनिधी):- संपूर्ण राज्यभरातून पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त दाखल होणार्या वारकर्यांसाठी काल बुधवार दि.17 जुलै रोजी सांगोला शहरात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांच्या वतीने फराळाचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
फराळ वाटपाचा प्रारंभ उद्घाटन पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या शुभहस्ते विठ्ठलाच्या मुर्तीचे पूजन करुन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांनी फराळाचे वाटप उपक्रम करुन सर्वांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला असे गौरवोद्गार काढत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, सचिव आनंद दौंडे, मोहन मस्के, अशोक बनसोडे, मनोज उकळे सर, दत्तात्रय खंडागळे, दिलीप घुले, किशोर म्हमाणे, मोहसीन मुलाणी, दिपक भाकरे, प्रविण घोंगडे, अमेय मस्के, लखन चव्हाण, अनिल पाटील, रवि चौगुले, संतोष जाधव उपस्थित होते.म
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे वतीने सांगोला शहर आणि तालुक्यात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांना फराळाचे वाटप केल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकार्यांचे वारकर्यांमधून कौतुक होत होते.