सांगोला विद्यामंदिर इ.१२ वी सीईटी वर्ग विद्यार्थी पालक शिक्षक सभा..

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला व सांगोला परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थ्यांना गुणात्मक व रचनात्मक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने पूज्य बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये विद्यामंदिरची स्थापना केली. स्थापनेपासून विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर आहे. सद्यस्थितीला बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून सांगोला विद्यामंदिरमध्ये इयत्ता अकरावी व बारावी सीईटी मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेत अभ्यासात सातत्य, नियोजन,परिश्रम, चिकाटीपणा हीच यशाची गुरुकिल्ली आहे हा विचार प्रमाण मानून सदोदित प्रयत्न केले तर परीक्षेत धवल यश मिळेल, असे प्रतिपादन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.
सांगोला विद्यामंदिर इयत्ता १२ वी सीईटी मार्गदर्शन वर्ग विद्यार्थी- पालक- शिक्षक सभेमध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, शास्त्र शाखेचे ज्येष्ठ अध्यापक प्रा.दिलीप मस्के उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य घोंगडे म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिद्द हीच दौलत समजून स्पर्धा परीक्षा संदर्भात ध्येय समोर ठेवावे व ते पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे.तसेच एकाग्रतेने मनन, चिंतनाद्वारे अभ्यास करावा.
या सभेमध्ये प्रा.माधुरी पैलवान यांनी बोर्ड व प्रा.मिलिंद देशमुख यांनी सीईटी संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून श्री.हरिदास राळके यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेसाठी इयत्ता बारावी सीईटी वर्गातील विद्यार्थी, पालक, ज्युनिअर कॉलेजमधील अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.उल्हास यादव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सुप्रिया गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.दिनेश जाधव यांनी केले..
One attachment • Scanned by Gmail



