maharashtra

सुविधा कर्ज व महिला समृद्धी योजनेसाठी भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत जिल्हा कार्यालयात देण्याचे आवाहन

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर,:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत  सुविधा कर्ज योजना-रु.5.00लाख व,  महिला समृध्दी योजना रु.1.40 लाख हया योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने दिनांक 22 मार्च 2024 रोजीपर्यंत भरणा करण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची व त्यासोबत जमा केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत 03 प्रतीत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास जमा करणे आवश्यक आहे.

ज्या अर्जदारांनी सुविधा कर्ज योजना रक्कम रु.5.00 लाख व महिला समृध्दी योजना रक्कम रु.1.40 लाख या योजनांमध्ये कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत, अशा अर्जदारांनी ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची व त्यासोबत जमा केलेल्या कागदपत्रांची प्रत एकूण 03 झेरॉक्स प्रतीत स्वयं साक्षांकित करुन दिनांक १८ जुलै 2024 रोजी पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास जमा करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!