महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिर येथे NMMS व स्कॉलरशिप मार्गदर्शन वर्गास शुभारंभ

सांगोला विद्यामंदिर प्रशाला,सांगोला येथे शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 8 वी NMMS व 8 वी स्कॉलरशिप परीक्षांकरिता प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गांचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्राचे पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.

साधारणत: डिसेंबर 2025 मध्ये होणा-या एन.एम.एम.एस. परीक्षा व फेब्रुवारी 2026 मध्ये होणा-या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण होऊन आठवी मध्ये जाणाऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांची वरील परीक्षांसाठी चांगल्या प्रकारे तयारी व्हावी म्हणून या उन्हाळी सुट्टीतील तासांचे नियोजन करण्यात आलेले असून यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, समाजशास्त्र हे विषय शिकवण्यात येणार आहेत.

यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड , उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, सुरेश मस्तूद, संस्था व प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे व वैभव कोठावळे, NMMS विभाग प्रमुख निलेश जंगम, स्कॉलरशिप विभाग प्रमुख रमेश बिले, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि एन.एम.एम.एस. व स्कॉलरशिप मार्गदर्शन वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button