अग्निपंख कुलातर्फे वाडेगाव प्रशालेमध्ये वृक्षारोपण

प. पू. उदयसिंह देशमुख (भैय्यू महाराज) प्रशाला वाढेगाव येथे श्रीमती गीता बनकर महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय सांगोला यांच्या छात्रसेवा कालांतर्गत अग्निपंख कुलाच्या वतीने गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी वाढेगाव प्रशाले मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. सुरेश पाटील सर ,माजी ग्रामपंचायत सदस्य हसीना भाभी तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. भगत मॅडम आणि शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष मा. श्री बालाजी केदार सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. उकळे सर यांनी भूषविले उकळे सर यांच्या अध्यक्षीय मनोगत यातून वृक्षारोपणाचे महत्त्व व लावलेल्या झाडांची काळजी घेण्यास विद्यार्थ्यांना सांगितले प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले
वृक्षारोपणाचा कार्यक्रमासाठी अग्निपंख कुलाचे मार्गदर्शक प्राचार्य गरंडे सर व प्रा. गयाळी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी अग्निपंख कुलाच्या छात्र मुख्याध्यापिका कुमारी मीरा ढोणे मॅडम व सर्व छात्राध्यापिकांच्या सहकार्याने संपन्न झाला सदर माहिती छात्राध्यापिका वहिदा मुलाणी मॅडम, हिना मुलाणी मॅडम तसेच शिरीन किरणगी मॅडम यांनी प्रसिद्धी विभागाकडे दिली.