आषाढी एकादशी निमित्त बुधवारी पालखी दिंडी नगर प्रदक्षिणा
सांगोला :- सांगोला शहरातील कोष्टी गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिर येथून आषाढी एकादशी निमित्त बुधवार दिनांक १७-७-२०२४ रोजी सकाळी सहा वाजता पालखी दिंडी नगर प्रदक्षिणा साठी निघणार आहे, सदर दिंडीमध्ये परिसरातील सर्व भाविक भक्तांनी भाग घेऊन पालखी दिंडीचा सोहळा आनंदाने साजरा करावा,
यामध्ये पुरुष, महिला, लहान मुले, सर्वांनी उपस्थित रहावे सदर दिंडी नामाचा गजर करीत भजन, भारुड ,फुगडी ,विठ्ठलाचा नाम घोष करीत बरोबर सकाळी सहा वाजता विठ्ठल मंदिर कोष्टी गल्ली येथुन निघणार आहे,
पालखी दिंडी मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक- हनुमान मंदिर मेन रोड -मणेरी गल्ली -परीट गल्ली- ( श्री संत डेबुजी चौक ) -शनी गल्ली -महादेव गल्ली- राम मंदिर -दत्त मंदिर- ब्राह्मण गल्ली -मार्गे विठ्ठल मंदिरापर्यंत जाईल व तिथे समारोप होईल, तरी सांगोला शहरातील सर्व भाविक भक्तांनी पालखी सोहळ्या आनंद घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल पुरुष भजनी मंडळ कोष्टी गल्ली सांगोला यांनी केले आहे.