रोटरी क्लब सांगोला व इनरव्हील क्लब सांगोला यांच्यावतीने वारकरी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…..

सांगोला आषाढी वारी निमित्त पंढरपूर कडे पायी जात असलेल्या वारकऱ्यांच्या मुक्काम रविवारी आदर्श प्राथमिक विद्यालय सांगोला येथे होता.रोटरी क्लब  सांगोला व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या वतीने या मुक्कामास असलेल्या वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.या तपासणी शिबिर मध्ये साधारण ६० वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.तसेच गरजूना मोफत औषधे वाटप करण्यात आले.
सदर वारकऱ्यांची तपासणी रो.डॉ. प्रभाकर माळी,रो डॉ. मच्छिंद्र सोनलकर ,रो.डॉ.अनिल कांबळे व डॉ.सौ.रुपाली बुरांडे मॅडम यांनी केली.या उपक्रमाचे सर्व भाविक भक्तांकडून स्वागत करण्यात आले व आनंद व्यक्त केला गेला.या कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष रो. इंजि.विकास देशपांडे,सचिव रो.इंजि.विलास बिले तसेच इनरव्हील क्लब च्या अध्यक्षा सौ.स्वाती अंकलगी व सचिव सौ.पल्लवी थोरात यांनी विशेष  परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम राबवण्यासाठी आदर्श प्रथमिक शाळेचे संस्थापक रो.डॉ. प्रभाकर नाना माळी व मुख्याध्यापक श्री.दीपक वाघमोडे सर यांनी विशेष सहकार्य केले.या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सदस्य रो.सौ.प्रतिमा माळी, रो दीपक चोथे,रो.अशोक गोडसे,रो.निसार इनामदार,रो.अरविंद डोंबे गुरुजी रो.शरणाप्पा हळळीसागर,रो. प्रा.महादेव बोराळकर इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button