लोणविरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री.अशोक दोडके यांची बिनविरोध निवड.

जवळे(प्रशांत चव्हाण):- लोणविरे ग्रामपंचायतच्या रिक्त झालेल्या सरपंच पदाचा निवडीचा कार्यक्रम मोठा उत्साहात मंगळवार दि. 26 मार्च 2024 रोजी पार पडला. यावेळी श्री.अशोक उत्तम दोडके यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड झाल्यानंतर नूतन सरपंच श्री.अशोक दोडके यांचा सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यावतीने माजी सरपंच श्री. तानाजी गाडेकर सर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सरपंच निवडीचा कार्यक्रम मंडळ अधिकारी श्री.जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी तलाठी श्रीमती मुजावर मॅडम व ग्रामसेवक श्री.सागर आदाटे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी श्री.किशोर बनसोडे,श्री.बापू ठोकळे श्री.तानाजी गाडेकर सर श्री.सुनील पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त करून नूतन सरपंच श्री.अशोक दोडके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.लोणविरे ग्रामपंचायत मध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, व आमदार श्री.शहाजी बापू पाटील गटाचे स्पष्ट बहुमत आहे. सरपंच पदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला.
सदर प्रसंगी माजी सरपंच श्री.साहेबराव माने, उपसरपंच सौ. कल्पनाताई मोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अंबादास गायकवाड सौ.मालती गायकवाड,सौ.संगीता गायकवाड,सौ.सुमनताई बोराडे,सौ.साधना माने,माजी उपसरपंच श्री.सुनील पाटील सांगोला अर्बन बँकेचे व्यवस्थापक श्री.धर्मराज बोराडे,श्री. अजित गायकवाड,पोलीस पाटील श्री.अजित पाटील श्री.आर बी गायकवाड सर,मा.तंटामुक्ती अध्यक्ष श्री.चंद्रकांत गायकवाड श्री.पोपट मोरे,श्री.सुहास ठोकळे मा. तंटामुक्ती अध्यक्ष श्री.रमेश गायकवाड, श्री.किरण पाटील श्री. रामदास माने मेजर, श्री.बबन गायकवाड,श्री.सुरेश माने,श्री. बाळासो गायकवाड,श्री.लक्ष्मण मोरे,श्री.सुभाष माने श्री.विठोबा आदलिंगे,श्री.पृथ्वीराज दोडके मेजर,श्री.बाळासो श्रीराम, श्री.पोपट गायकवाड,श्री.मधुकर माने,श्री.अविनाश माने यांच्यासह ग्रामस्थ, तरुण वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर बी गायकवाड यांनी केले तर आभार श्री.अजित गायकवाड यांनी मानले.