महाराष्ट्र

पंचायत समिती सांगोला येथे माझी वसुंधरा अभियान 5.0 बूट कॅम्पचे आयोजन

सांगोला (प्रतिनिधी) :-  पंचायत समिती सांगोला बचत भवन येथे माझी वसुंधरा अभियान 5.0 बुट कॅम्प आयोजित केला असून यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तांत्रिक तज्ञ मार्गदर्शिका सानिका बागवान मॅडम उपस्थित होत्या पंचायत समिती सांगोल्याच्या वतीने ग्रामपंचायत मेडसिंगी च्या सरपंच सौ उमा प्रताप सिंह इंगवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून या कार्यशाळेस गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, विस्तार अधिकारी पंचायत अमोल तोडकरी, विस्तार अधिकारी पंचायत देवराज पुकळे, विस्तार अधिकारी कृषी प्रतिभा पवार मॅडम ,विस्तार अधिकारी आरोग्य मिलिंद सावंत यांनी मार्गदर्शन केले तसेच या अभियानास उपस्थित सर्व गावचे सरपंच/ प्रशासक ग्रामपंचायत अधिकारी, डाटा ऑपरेटर,   बी आर सी ,सी आर सी एस बी एम ब्लॉक काॅडनेटर ऊपस्थित होते
माझी वसुंधरा बाबत टूलकिट ग्रामीण अभियानाची रचना कार्बन पृथक्करण, हरित वायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार  करणे या तीन बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगितले आहे अभिनकालावधी 1 जून 24 ते 31 मार्च 25 आहे यामध्ये  थिमॅटिक क्षेत्र जल, वायू, भूमी, आकाश व अग्नी असून एम आय एस भरण्यासाठी मार्गदर्शन करून प्रत्येक ग्रामपंचायतने फेसबुक, युट्युब  व instagram हे अकाउंट ग्रामपंचायत नी काढणे गरजेचे असल्याची माहिती सानिया बागवान यांनी दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button