मोकाट जनावरांचा सांगोल्यात प्रवाश्यांना त्रास; भर चौकात जनावरांचा मुक्काम

सांगोला/प्रतिनिधी :: सांगोल्यात रहदारीच्या विविध ठिकाणी मोकाट जनावरे बिनधास्त रवंथ करीत बसलेली असतात. त्यामुळे वाहन धारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुचाकी स्वार  व पायी चालत जाणाऱ्या नागरिकांचा जनावरांमुळे अपघात झाल्याचे समजते. याकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने पहावे असा नागरिकांतून सुर येत आहे.
सांगोला शहराच्या मध्यवर्ती व रहदारीच्या भागात तसेच कोल्हापूर – सोलापूर हायवे वर मिरज रोड, वाढेगांव चौक, मंगळवेढा,पंढरपूर रोड, वासुद चौक ते कर्मवीर नगर आणि गाव भागातील भाजी मंडई इतकाच काय तर नगरपरिषदेच्या समोरील रस्त्यावर व नेहरू चौक या ठिकाणी दिवसभरात अनेक वेळा मोकाट जनावरे  ठीय्या मांडून बसलेली असतात. दिवसभरात हीच जनावरे भुसार  मालाच्या दुकाना समोर ठेवलेल्या धान्यात,भाजी व फळ विक्रेत्यांच्या भाज्यांत व फळात  तोड घालून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत असताना दिसून येतात.
दरम्यान व्यवसाय मालकाने जनावरे हाकालण्याचा प्रयत्न केल्यास ही जनावरे उधळतात.अशावेळी रस्त्याने जाणा येणाऱ्या सायकल, दुचाकीस्वार व पायी चालणाऱ्या नागरिकांना जनावरांचा धक्का लागून अपघात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी मोर्निग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांना देखील यापूर्वी याचा त्रास झालेल्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत .आजच सकाळी एका वृद्धाचा  जनावरांमुळे गंभीर अपघात झाला असून त्यात त्यांना मोठी इजा झाली आहे. आषाढी वारी दरम्यान वारीसाठी पंढरपूर कडे जाणाऱ्या,येणाऱ्या वारकऱ्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागला आहे.असे असताना देखील या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक,वाहन चालक व व्यापारी करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button