29 ऑगस्टला बैठक घेऊन आमदार पाडायचे की ठेवायचे…….

मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये पाचव्यांदा उपोषणास सुरुवात केली आहे. 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. यावेळी आपल्याला राज्यात मतदारसंघनिहाय तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.
29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी चार-पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीकरण जुळले नाही तर पाडापाडी करावी लागेल असं म्हटलंय.
एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला समीकरण जुळवावं लागणार आहे असं मनोज जरांगे म्हणालेत. समीकरण जुळले नाही तर आपल्याला उमेदवार उभे करून जमणार नाही. जो म्हणेल ओबीसीमधून तुमची मागणी पूर्ण करू त्याला निवडून आणायचं. मग पाडापाडी करावी लागेल असं म्हणत 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.
चार ते पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच
राज्यात असा एकही मतदार संघ नाही ज्यात 50 हजार मराठा नाहीत. एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही. चार-पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असा आश्वासन त्यांनी मराठा समाजाला देत आज पासून इच्छुकांनी यायला हरकत नाही असं मनोज जरांगे म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला मतदारसंघनिहाय तयारी करायची आहे. यासाठी सर्व डेटा तयार करण्यासाठी सर्वांनी 14 ते 20 ऑगस्टमध्ये इच्छुक उमेदवारांनी यावं असा आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज तरंगे यांनी सर्व जाती धर्मातील इच्छुक उमेदवारांनी तसेच छोटे-मोठे पक्ष आजी-माजी सर्वांनी यावे. गावागावातून माहिती घ्या, उमेदवार पसंत नसला तरी त्याला मतदान करायचं असे म्हणत राज्यातील आंदोलनाच्या वर्षपूर्ती रोजी म्हणजेच 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय.