सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन सन – २०२२-२३ पासून सुरुवात

विविध गुणदर्शन व नाटिका याचे होणार बहारदार सादरीकरण
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन सन २०२२-२३ आज गुरुवार दि.२२ डिसेंबर २०२२ ते २४ डिसेंबर २०२२ या कालावधीत विविध कर्यक्रमाने संपन्न होणार आहे.
यामध्ये गुरुवार दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८.४५ वा.ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी शिक्षक दिन,सकाळी १०.०० वा.प्रशाला विद्यार्थी शिक्षक दिन व दुपारी २.०० वा.प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाटिका व ज्युनिअर कॉलेज विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व फिशपॉंडस अर्थात शेलापागोटे दुपारी २.०० वाजता प्रशाला विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच सकाळी १०.०० मा. राहुल देशमुख आगार प्रमुख सांगोला यांच्या शुभहस्ते व संस्था सचिव मंडळ म.शं. घोंगडे यांच्या उपस्थितीत फनफेअर, डॉ.शैलेश डोंबे यांच्या शुभहस्ते व संस्था सदस्य विजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन, संस्था सदस्य सौ.शीलाकाकी झपके यांचे शुभहस्ते व संस्था खजिनदार शंकरराव सावंत यांचे उपस्थितीत कला प्रदर्शन, इनरव्हील क्लब सांगोला अध्यक्ष सौ.उमा उंटवाले यांचे शुभहस्ते व संस्था सदस्य दिगंबर जगताप यांचे उपस्थितीत रांगोळी प्रदर्शन उद्घाटन संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी मा. सुहेल अ.काझी, (भा. रा. से.)अपर आयुक्त,GST महासंचालनालय,
पुणे क्षेत्रीय विभाग, पुणे यांचे शुभहस्ते व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमास विद्यार्थी व पालक यांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा. गंगाधर घोंगडे पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार , बिभीषण माने व ज्युनिअर कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा. धनाजी चव्हाण,प्रशाला उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव यांनी केले आहे.