सांगोला तालुका

सामान्य नागरिकांना सतत उपलब्ध असणारे उत्तम प्रशासक ” कैलास केंद्रे” !

सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी पदाच्या साडे तीन वर्षाच्या कारकिर्दीत श्री.कैलास केंद्रे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लोकाभिमुख प्रशासनास महत्व देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले.सर्व शासकीय योजनांची शहरात प्रभावी अंमलबजावणी करून एक आदर्श निर्माण केला.कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी अत्यंत आपुलकीने संवाद करून त्यांच्या प्रश्नांची तात्काळ उकल करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख होती.कोरोना च्या भीतीच्या काळात आपल्या संपूर्ण टीम समवेत फिल्ड वर उतरून केलेल काम,घेतलेले धाडसी निर्णय,त्यांची कडक अंमलबजावणी यांच्यामुळे त्यांच्या कार्याची उंची आणखीनच वाढली.

त्यांच्या 3.5 वर्षांच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णय,सुरू केलेल्या उपक्रमांपैकी महत्वाच्या कार्याचा घेतलेला मागोवा…….

(1) महिलांच्या स्वरक्षणासाठी मुख्याधिकारी केंद्रे यांच्या संकल्पनेतून सांगोला नगरपरिषदेमार्फत मोफत कराटे प्रशिक्षण चा “ऑपरेशन दुर्गा” हा उपक्रम सुरु करण्यात आला. अश्या प्रकारचा विधायक व नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करणारी सांगोला नगरपरिषद ही राज्यातील पहिलीच नगरपरिषद असून आजरोजी तब्बल 400 मुलींचे मोफत कराटे प्रशिक्षण नगरपरिषदे मार्फत सुरू आहे.

(2) मुख्याधिकारी केंद्रे यांच्या संकल्पनेतून *”सांगोला वृक्ष बँक”* ची 7 जाने 2020 ला सथापना नगरपरिषदेमार्फत करण्यात आली.शासकीय कार्यालय स्तरावरील राज्यातील हा पहिला प्रयोग होता.केंद्रे यांच्या कार्यकाळात 3.5 वर्षात साधारण 15,000 झाडे शहरात लावली गेली आहेत व त्यांचे संवर्धन देखील केले जात आहे.

(3) मुख्याधिकारी केंद्रे यांनी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे व उचलेल्या कडक पावलांमुळे शहराचा मृत्युदर अर्ध्या टक्या पेक्षा कमी राहिला. कोरोना काळातील त्यांचे कार्य सांगोलकरांच्या कायम स्मरणात राहील.

(4) प्रधानमंत्री आवास योजनेतून माघील 3.5 वर्षात 200 लाभार्त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे.

(5) त्यांच्या कार्यकाळात NULM योजने अंतर्गत 100 पेक्ष्या जास्त महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून देऊन तसेच त्यांना कमी व्याज दराचे 1.5 कोटी पेक्षा जास्त कर्ज उपलब्ध करून पापड बनवणे,शेळीपालन इत्यादी व्यवसाय करण्यास व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोठा हातभार लावला आहे

(6) ‘पीयम स्वनिधी’ योजनेच्या माध्यमातून 200 पेक्षा जास्त फेरी वाल्यांना कोरोना काळात 10 हजारांचे विनातरण कर्ज उपलब्ध करून देऊन विस्कटकेली आर्थिक घडी बसवण्यास हातभार लावला.

(7) शहरातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींचा 4 लाखांचा विमा उतरवून दिव्यांग निधी खर्ची टाकण्याची एक नवी दिशा मुख्याधिकारी केंद्रे यांनी सबंध राज्याला दिली.

(8) कडलास रोड येथील कचरा डेपो वर *”मैला प्रक्रिया केंद्र(FSTP)”* तयार करून त्याठिकाण मैलापासून सोनखत निर्मितीस सुरुवात केली.

(9) मुख्याधिकारी केंद्रे यांच्या दूरदृष्टीतून सांगोले नगरपरिषद मार्फत *”पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प”* राबविला गेला ज्यामुळे *दर महिन्याला साधारण 30 लाख लिटर पाण्याची बचत होत आहे*

(10) सांगोला शहरातील भूजल पातळी वाढावी यासाठी मुख्याधिकारी केंद्रे यांच्या संकल्पनेतून शहर हद्दीत 100 पेक्षा जास्त शोष खड्डे बनविण्यात आली आहेत.

अश्या प्रकारे सतत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून मुख्याधिकारी केंद्रे हे आपल्या कामाची वेगळी छाप पाडून गेले आहेत.आपल्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास वेळ देऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे केंद्रे यांच्या कार्य शैलीचे वैशिष्ट्य होत.आपल्या पदाचा कुठलाही गर्व न करता कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी तसेच सफाई कामगार,ड्राइवर व आपल्या स्टाफ शी आपुलकीने बोलणारा अधिकारी अशी केंद्रे यांची ओळख होती. सांगोला येथील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे बदली झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!