सांगोला येथे आमदार चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

सांगोला(प्रतिनिधी):- जाणता राजा स्पोटर्स अकोला(वा.) व गुंडादादा खटकाळे मित्र परिवार सांगोला तालुका आयोजीत आमदार चषक 2022 भव्य डे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस काल मंगळवार दि.8 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथील क्रिडांगणावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास भाजपा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, गुंडादादा खटकाळे, मा.नगरसेवक संजय देशमुख सर, अनिलनाना खटकाळे, मा.नगरसेवक सोमेश यावलकर, विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे, सुनीलशेठ शिंदे, उद्योजक संजय केदार, नवनाथ खटकाळे, सौदागर केदार, आबा इंगोले, दादा वाघमोडे, मंगेश रायचूरे, राजू शिंदे, मेजर समाधान नकाते,बबलू इंगोले यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विजेत्या संघास 71 हजार रुपये, व्दितीय क्रमांक विजेत्या संघास 51 हजार, तृतीय क्रमांक विजेत्या संघास 31 हजार रुपये तर चतुर्थ क्रमांक विजेत्या संघास 21 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये वैयक्तीक बक्षीसे खेळाडूंना देण्यात येणार आहेत.