क्राईममहाराष्ट्रसांगोला तालुका

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आता पशुधन चोरीचे नवीन संकट; सांगोल्यात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ;

 सांगोला(प्रतिनिधी):-गेल्या काही दिवसांपासून सांगोल्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला असताना आता जनावरं चोरीचं संकटही शेतकर्‍यांसमोर उभं राहिलेलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यात जनावरं चोरणार्‍या टोळीनं धुमाकूळ घातला असून गेल्या दोन दिवसात  तब्बल २४ जनावरं चोरट्यानी चोरून नेली असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे. पशुधनाच्या वाढत्या चोरीमुळे जनावरे कत्तलखान्यात तर नाहीत ना जात अशी भिती पशुपालक शेतकर्‍यांमधून व्यक्त केली जात आहे.

वाकी शिवणे येथे १३ शेळ्यांची चोरी
सांगोला(प्रतिनिधी):- घराचे समोरील शेड मध्ये बांधलेल्या 36 हजार रुपये किमंतीच्या ८ शेळ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्या असल्याची घटना वाकी शिवणे ता.सांगोला येथे घडली. याबाबत मकरंद विजयकुमार चादणे यांनी दिली. तसेच गावातील बाजीराव तानाजी घाडगे यांचे ही घराचे समोरील शेड मध्ये बांधलेल्या 5 शेळ्या ही चोरट्यानी पळवून नेल्या आहेत.
यामध्ये 20000/- रुपये किंमतीच्या ४ शेळ्या, 8,000/- रुपये किंमतीचे दोन बोकड व 8,000/-रुपये किमतीच्या  दोन पाटरे असा एकूण 36 हजार रुपये किंमतीची ८ शेळ्या पळवून नेल्या आहेत.
दि. 26/11/2023 रोजी रात्री 11/00 वा. वे सुमारास चागणे कुटुंबिय जेवण खान करुन झोपी गेले. यावेळी घराचे समोर असलेल्या पत्र्या शेड मध्ये 4 शेळ्या, 2 बोकड, 2 पाटर असे एकुन 8 शेळ्या होत्या. नेहमी प्रमाणे पहाटे 5 वाजता झाडलोट करण्याकरीता गेल्यावर  4 शेळ्या, 2बोकडे, 2 पाटरे दिसुन आली नाहीत. त्यानंतर सदर शेळ्याच्या घराचे आजुबाजुस वाकीशिवणे गावात शोध घेतला असता त्या मिळुन आल्या नाहीत. त्यावेळी  समजले की, गावातील बाजीराव तानाजी घाडगे यांचे ही घराचे समोरील शेड मध्ये बांधलेल्या 5 शेळ्या ही चोरीस गेल्या असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

चोरट्यांनी चार चाकीतुन येवुन वासुद येथे पळविल्या 2 शेळ्या
सांगोला(प्रतिनिधी):- घरासमोरील पत्रा शेडमध्ये बांधलेल्या 14 हजार रुपये किंमतीच्या दोन शेळ्या अज्ञात चोरट्यांनी पांढर्‍या रंगाची चारचाकी वाहनातुन चोरुन नेल्या असल्याची घटना वासूद ता.सांगोला येथे घडली. चोरीची फिर्याद अनिल जगनाथ केदार यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे  चुलते विलास काशिनाथ केदार हे कुटुंबासोबत राहण्यास असुन ते शेती करुन त्याचे कुटुंबाची उपजिवीका करतात. तसेच शेती जोड धंदा म्हणुन त्यानी शेळीपालन व जनावरे पालन व्यवसाय करतात. दि. 26 नोव्हेंबर रोजी रात्री 11/00वा. चे सुमारास  जेवण खान करून झोपी गेले होते. त्यावेळी विलास केदार  यांचे घराचे समोर असलेल्या पत्र्या शेड मध्ये 2 शेळ्या होत्या. नंतर पहाटे 2 च्या सुमारास काहीतरी आवाज आल्याने घरातील सर्वांनी घराचे बाहेर येऊन पाहीले असता त्यांना पांढर्‍या रंगाची चार चाकी वाहन  दिसून आले.ते  वाहन निघुन गेल्यानंतर घराचे समोर असलेल्या पत्राशेडमध्ये शेळ्या बांधलेल्या ठिकाणी शेळ्या पाहिल्या असता त्या दिसुन आल्या नाहीत त्यानंतर त्यांची खात्री झाली की त्या वाहनातुन अज्ञात चोरट्याने त्याचे आर्थिक फायद्यासाठी त्याचे गाडीमध्ये शेळ्या चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

कमलापूर येथे 7 शेळ्या व 2 बोकडांची चोरी
सांगोला(प्रतिनिधी):- घरासमोरील पत्रा शेडमध्ये बांधलेल्या 34,000/- रुपये किंमतीचे सात शेळ्या व दोन बोकडे तसेच घराशेजारील  चार शेळ्या कोणीतरी अज्ञाच चोरट्याने नेल्या असल्याची घटना ढंगे मळा कमलापुर ता, सांगोला येथे घडली.यावेळी चोरट्यांनी 26,000/- रुपये किंमतीच्या सात शेळ्या व  08,000/- रुपये किंमतीची दोन बोकड पळवून नेली असून चोरीची फिर्याद नारायण आदलिगे यांनी दिली आहे.
दिनांक 25/11/2023 रोजी रात्री 10/30वा, च्या  जेवणखान करुन आदलिंगे कुटुंबिय झोपी गेले होते.  त्यावेळी  शेळ्या घरासमोरील पत्रा शेडमध्ये बांधलेल्या होत्या. त्यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास  बांधरुमला उठलो असता  घरासमोरील पञा शेडमध्ये  शेळ्या व बोकड दिसुन आल्या नाहीत. त्यावेळी शेळ्यांचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला परंतु त्या मिळुन आल्या नाहीत म्हणून चुलत भाऊ सागर आदलिंगे यास आवाज देवुन उठवुन त्यांना सदर घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी त्याचे ही घरासमोर पञा शेडमध्ये बांधलेल्या चार शेळ्या नसल्याचे दिसल्याने आम्ही सदर शेळ्यांचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला परंतु त्या मिळुन न आल्याने आमची खात्री झाली की, आमच्या शेळ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या संमती वाचुन चोरुन नेल्या असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

पशुधनाच्या चोर्‍यांबाबतच्या अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार पोलीस स्टेशनला केल्या आहेत. परंतु अजून पर्यंत या चोरट्याना आळा घालण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. परिणामी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनावरे चोरी होत आल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरूच आहेत जनावरांच्या चोरीकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी वर्गांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!