सांगोला तालुका

सिमला मिरचीचा व्यापाऱ्याची ४ लाख ३० ह.रू फसवणूक; परप्रांतीय गाडी मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल*

सांगोला ( प्रतिनिधी):- असनसोल, प.बंगाल येथे पाठविलेली चार लाख तीस हजार रुपये किमतीची ८ हजार तीनशे किलो सिमला मिरची गाडी मालक व ट्रक चालकाने परस्पर हडप केल्याने भाजीपाला व फळे खरेदी विक्री व्यापारी नवनाथ गोरख भोसले  यांनी ट्रक मालक संभीत साहु, रा भुवनेष्वर व चालक रयत्रीनाथ या दोन जनाविरुद्ध सांगोला पोलिसात अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नवनाथ  भोसले  हे भाजीपाला व फळे खरेदी विक्री चा व्यवसाय करतात त्यांचे मार्केटयार्ड सांगोला येथे आर्यन रोडलाईन्स नावाचे कार्यालय आहे ते सांगोला तालुक्यामध्ये शेतक-यांकडुन भाजीपाला व फळे विकत घेऊन भारतामध्ये ज्या ठिकाणी शेतमालाचे चांगले दर असतील अशा ठिकाणी सदरचा माल भाड्याचे गाडीने पाठवीत असतात व्यवसायानिमित्त त्यांची संभीत साहु, रा भुवनेष्वर, ओडीसा पुर्ण पत्ता माहीत नाही याचेशी ओळख झाली होती.

भोसले हे संभीत साहु यांना कधीही भेटले नाहीत परंतु वारंवार फोनवरून व्यवसायासंदर्भात बोलणे होत असे संभीत साहु याचेकडे अशोक लेलंन्ड सहा टायर क्रमांक गाडी असल्याने सदरची गाडी ही संभीत साहु यास फोन करून भाजीपाला व फळे मार्केटला ने आण करणेकरीता मागवीत असत दि.८ सप्टेंबर रोजी भोसले यांनी किरण शिंदे, रा.मानेगाव, ता सांगोला यांचेकडुन ८ ह.३०० किलो शिमला मिर्ची घेतली होती सिमला मिरचीचा दर बाजारपेठेत चौकशी केल्यानंतर असनसोल, प.बंगाल येथील बाजारपेठेमध्ये चांगला दर असल्याने भोसले यांनी सदरचा माल हा असनसोल, बंगाल येथे पाठवीण्याचे ठरवीले.

त्यांच्या ओळखीचे संभीत साहु यांस फोन केला व त्याची गाडी कोठे आहे याबाबत विचारणा केली असता त्याने गाडी ही सांगोला मध्येच असल्याचे सांगीतल्याने भोसले यांनी संभित साहू यास त्यास त्याची गाडी दुकाणामध्ये पाठवीण्यास सांगीतली काही वेळाने सायं.५ वा चे दरम्याण संभीत साहु यांच्या  गाडीवरील ड्रायव्हर रयत्रीनाथ (पूर्ण नाव माहीत नाही ) याचे गाडीत ८ ह.३०० किलो शिमला मिर्ची त्याचे गाडीमध्ये भरण्यास सांगीतली व सायं.७ वा. चे सुमारास रयत्रीनाथ यांस सिमला मिरची माल असनसोल, बंगाल येथील मार्केटमध्ये खाली करावयाचा आहे असे सांगून गाडी रवाना केली दरम्यान सिमला मिरचीने भरलेली गाडी दिनांक दि.१० सप्टेंबर रोजी असनसोल, बंगाल येथे पोहचणे आपेक्षीत होते म्हणुन भोसले यांनी गाडीवरील चालक रयत्रीनाथ यास फोन केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. भोसले यांना शंका आल्याने चालक रयत्रीनाथ यास वारंवार फोन केला असता, त्याने भोसले यांचा फोन उचलने बंद केले. म्हणुन भोसले यांनी गाडी मालक संभीत साहु यास फोन केला असता त्यानेही सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली व नंतर फोन उचलने बंद केले. तेव्हा भोसले यांच्या लक्षात आले की विश्वासाने विक्रीकरता दिलेला शिमला मिर्ची माल हा संभीत साहु व रयत्रीनाथ (पुर्ण नावे व पत्ता माहीत नाही) यांनी अपहार केलेला आहे याबाबत नवनाथ भोसले यांनी संभीत साहु व रयत्रीनाथ यांनी संगणमत करूण सिमला मिरची सांगितलेल्या ठिकाणी न नेता परस्पर ४ लाख ३० ह. रू.ची मालाची फसवणुक केल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!