सांगोला इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्यांचा आज पदग्रहण समारंभ
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्यांचा आज शनिवार दि.20 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे पदग्रहण समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती नूतन अध्यक्षा सौ.स्वाती अंकलगी यांनी दिली. पदग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट 317 इनरव्हील क्लब ऑफ सांगलीच्या एडिटर सौ.सविता तंगडी या उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीच्या क्लबच्या अध्यक्ष म्हणून सौ स्वाती मकरंद अंकलगी तसेच सेक्रेटरी म्हणून सौ पल्लवी थोरात यांची निवड झाली. सौ सुजाता पाटील व्हाईस प्रेसिडेंट, सौ अनिता कमले ट्रेझरर, सौ संगीता चौगुले आय एस ओ, सौ.मंगल चौगुले एडिटर , आय पी पी सौ सविता लाटणे अशी इतर पदाधिकार्यांची निवड झाली.तरी या पदग्रहण समारंभ सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन नूतन सेक्रेटरी सौ.पल्लवी थोरात यांनी केले आहे.