फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी सांगोला येथील ए डी एम एल टी कोर्सची विद्यार्थिनी कु नम्रता राजेंद्र चोपडे यांची महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून नेमणूक

येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मधील कु नम्रता चोपडे यांची महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झाली. फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये MSBTE अप्रूव्हल ADMLT कोर्स शिकवला जातो त्या अंतर्गत पॅथॉलॉजी प्रयोगशाळेशी संबंधित लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतात हा कोर्स 3 सेमिस्टर मध्ये पूर्ण करावयाचा असून त्यासाठी दीड वर्षाचा कालावधी शासनातर्फे देण्यात आलेला आहे आरोग्य सेवेच्या वाढत्या मागणीमुळे ADMLT कोर्सला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे वरील नमूद केलेल्या मुलीची यशोगाथा या ठिकाणी अधोरेखित होते कु नम्रता चोपडे यांनी मेहनतीने हा कोर्स पूर्ण करून सरकारी नोकरीत पदार्पण केले आहे
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, परिसर संचालक डॉ. संजय आदाटे व फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या.