सांगोला तालुका

घराणेशाहीची परंपरा मोडून काढु आणी बळीराजाला न्याय मिळवून देवू : आम. शहाजीबापू पाटील; कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे सर्व अधिकार आबा- बापूंना : उपस्थितांचा एकमुखी ठराव

मागील 50 वर्षाच्या कार्यकाळात एक हाती सत्ता देऊन स्व. भाई गणपतरावजी देशमुख यांनी जो निर्णय घेतला त्याला आजवर तालुक्याने सन्मान दिला, आता त्यांचे नातू निर्णय घ्यायला लागले ते तालुक्याने मान्य करायचे का?, ही भयान परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेवुन त्यांची सुरक्षितता आणि सन्मान वाढवण्यासाठी या निवडणुकीत उतरलो आहोत. एकाच कुटुंबात एक हाती सत्ता ही लोकशाहीला धोका आहे. ही घराणेशाहीची परंपरा मोडून काढत बाजार समितीचा पारदर्शी कारभार करुन बळीराजाला न्याय मिळवून देणार आहे. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची  असून  निवडणुक जिंकण्याच्या इराद्याने कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उतरावे, विजय निश्चित आपलाच असेल असा विश्वास आम. शहाजीबापू पाटील यांनी दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची काल सोमवार दिनांक 27 रोजी बैठक पार पडली. बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना आम. शहाजीबापू पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रबुद्धचंद्र झपके सर, ज्येष्ठ नेते बाबुराव भाऊ गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, उद्योगपती भाऊसाहेब रुपनर, युवा नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील, युवा नेते सागर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,  भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संभाजीतात्या आलदर, जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, माजी नगरसेवक शिवाजीनाना बनकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आम. शहाजीबापू पाटील म्हणाले, राज्यात इतर बाजारपेठेच्या तुलनेत नावाजलेल्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीच्या निमित्ताने आलेल्या व्यापारी व शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय बाजार समितीच्या आवारातून  चाकूचा धाक दाखवून शेतकऱ्यांची होणारी लूट, खरेदी-विक्रीच्या निमित्ताने आलेल्या  शेतकरी बांधवां च्या सुरक्षिततेबरोबरच त्यांना लागणाऱ्या सर्व सुख सोयी निर्माण करून देण्यासाठीच सुरक्षित बाजार समितीचे स्वप्न साकार करण्यासाठीच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे मतदार कमी असला तरी या निवडणुकीकडे गांभीर्याने व जबाबदारीने पहात ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हितासाठी जिंकायचे आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कामाला लागावे भविष्यात सांगोला कृषी उत्पन्न समिती ही एक आदर्शवत संस्था बनेल यासाठी आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत असे शेवटी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सर्वच कार्यकर्त्यांची मन जाणून घेतल्यानंतर आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांचा विचार करूनच आम्ही व्यासपीठावरील मंडळी निर्णय घेणार आहोत. तुमच्या जे मनात आहे तेच उद्याच्या निवडणुकीत होईल असा विश्वास देत, विधानसभेच्या निवडणुकीपासून तालुक्यातील वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात जे घडलं तेच राज्यात देखील घडलं, सरकार बदलल्यानंतर सांगोला तालुक्याचे कसं असा प्रश्न उपस्थित करीत अनेकांनी तर्क वितर्क व्यक्त केले परंतु तालुक्यातील परिस्थिती काही असेच ठेवत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कार्य केले आहे. स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आम्हा सर्वांना सहानुभूती होती. त्यामुळे सूतगिरणी, सोसायटी, खरेदी-विक्री संघ या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या विनंतीला मान दिला परंतु याचा अर्थ त्यांनी वेगळा काढत गाव गाड्यांच्या राजकारणात वेगळे वातावरण निर्माण केले. म्हणून आजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्याकडून त्याचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून कार्यकर्त्यांना जे पाहिजे तेच राजकारणात घडेल असे सांगत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देत, बाजार समितीच्या माध्यमातून बळीराजाचे हित जोपासले जाईल तसेच सोलापूर जिल्ह्यात आणि सबंध राज्यात एक आदर्शवादी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू असा विश्वास मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.

यावेळी ज्येष्ठ नेते बाबुरावभाऊ गायकवाड,  प्रा. पी. सी. झपके सर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर, माजी नगरसेवक शिवाजीनाना बनकर, भाजपाचे नेते संभाजी तात्या आलदर यांनी आपले विचार व्यक्त केले. तर उपस्थितांमधून देखील कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली. या विचार विनिमय बैठकीसाठी सांगोला तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन- संचालक, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच -उपसरपंच -सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!