विज्ञान महाविद्यालय सांगोला राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत व्यसन मुक्ती कार्यक्रम संपन्न

विज्ञान महाविद्यालय सांगोला राष्ट्रीय सेवा योजना समिती मार्फत मौजे चिंचोली येथे दिनांक ७/२/२०२२ रोजी विशेष श्रम संस्कार शिबिरामध्ये (शिबिराच्या पाचव्या दिवशी ) सकाळी आठ ते बारा पर्यंत चिंचोली धायटी रोड परिसर व आजूबाजूची स्वच्छता करण्यात आली तसेच दुपारी तीन ते पाच दरम्यान प्रा दीपक खटकाळे (संचालक,सां. ता. शे. शि. प्र. मं. सांगोला) यांनी व्यसनमुक्ती या विषयावर प्रबोधन केले. खटकाळे सर पुढे म्हणाले कि सर्वांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. तंबाखू, दारू, इ सिगारेट ,गुटखा, मावा ,चरस, गांजा यापासुन दूर राहावे, कारण व्यसनांचे दुष्परिणाम खूप आहेत. कर्करोग फुफ्फुसाचे आजार, किडनीचे आजर,हृदय विकार यासारखे आजार उद्भवतात. तरी सर्व युवकांनी आपले आरोग्य सदृढ ठेवावे.तसेच याशिवाय तरुण पिढीला मोबाईलचे व्यसन मोठ्या प्रमाणात लागले आहे तरी मोबाइलचा योग्य वापर करावा असे आवाहन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत गुरुजी यांनी सर्वांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक डॉ. काकासाहेब घाडगे यांनी केले तर आभार स्वयंसेविका कु. महेक पठाण यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग, स्वयंसेवक , स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.